चालू घडामोडी  07 जुलै 2021


मंत्रिमंडळात चेहरेबदल : राज्यातील नव्या चार जणांना मंत्रीची संधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला मंत्रिमंडळ विस्तारात फेब्रुवारी 43 मंत्र्यांनी शपथ घेतली.

केंद्रीय मंत्रिमंडळातील पहिले सहकार मंत्री त्याच्या अमित शहा यांच्याकडे देण्यात आले असून त्यांच्याकडील गृहमंत्री पदाची जवाबदारी कायम ठेवण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणे, कपिल पाटील, भागवत कराड आणि डॉक्टर भारती पवार यांना स्थान मिळाले असून या चार मंत्र्यामुळे राज्याला मिळालेल्या मंत्री पदांची संख्या आठ झाली. केंद्रीय मंत्रिमंडळ यांच्या नव्या रचनेत डॉक्टर भारती पवार या राज्यातून मंत्रीपद मिळालेल्या एकमेव महिला मंत्री आहेत.


डॉ. भारती पवार यांना आरोग्य कार्यालयातील राज्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे, नारायण राणे यांच्याकडे सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंडळाची जबाबदारी तर भागवत कराड यांना अर्थ राज्यमंत्रीची जबाबदारी देण्यात आली. तर कपिल पाटील नवे पंचायतराज राज्यमंत्री असतील.


राज्यात अखेर शाळा होणार : 15 जुलै पासून

राज्यात आठवी बारावीचे वर्ग 15 जुलैपासून प्रत्यक्षात सुरू करण्यासाठी राज्य शासनाने अखेर मान्यता दिली आहे त्या अनुषंगाने या पार्श्वभूमीवर नव्या मार्गदर्शक सूचना असलेले नवे परिपत्रक शालेय शिक्षण विभागाकडून बुधवारी प्रसिद्ध  करण्यात आली आहे.



परिपत्रकातील काही महत्वाच्या मार्गदर्शक सूचना :


ग्रामपंचायत स्तरावर सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली तलाठी, समितीचे अध्यक्ष, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी,ग्रामसेवक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांची समिती गठीत करावी. 

शाळा सुरू करण्यापूर्वी गावात किमान एक महिना पूर्ण कोरोना रुग्ण आढळलेल्या नसावा. शिक्षकांच्या लसीकरणासाठी जिल्हाधिकारी नियोजन करावे त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद आणि शिक्षण अधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे पाठपुरावा करावा.

 

school-reopen-maharashtra-corona
school reopen in maharashtra

शाळा सुरू करण्यापूर्वी "चला मुलांनो, शाळेत चला " मोहीम राबवावी.

विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यासाठी पालकांची संमती आवश्यक आहे.

विद्यार्थी कोरोनाबाधित झालेल्या शाळा तत्काळ बंद करावे, निर्जंतुकीकरण करावे, विद्यार्थ्यांचे विलगीकरण करून वैद्यकीय उपचार सुरू करावेत. शाळा तात्पुरती बंद करावे लागल्यास शाळेत शिक्षण सुरू राहण्यासाठी काय उपाययोजना करावी याचा कृती आराखडा तयार करावा, असे परिपत्रकात म्हटले आहे. 


शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी कोरोना चाचणीचे प्रमाणपत्र शाळेला प्रदान करावे, शाळा व्यवस्थापनाने प्रमाणपत्राची पडताळणी करावी. शाळा सुरु करण्यापूर्वी कोरोना संबंधित सुरक्षितेच्या उपायांबाबत जनजागृती करावे. मानसिक आरोग्याच्या समस्या सांगणाऱ्या शिक्षक व विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्याचे नियोजन करावे, असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले.