चालू घडामोडी 08 जुलै 2021
💥 भारतातील पहिले फास्ट फास्ट टॅग वर आधारित कॅशलेस पार्किंग
दिल्ली मेट्रो रेल निगमने भारतातील पहिले फास्ट फास्ट टॅग ( Fastag ) किंवा UPI वर आधारित कॅशलेस पार्किंग व्यवस्थेची सुरुवात 06 जुलै 2021 पासून
या कॅशलेस पार्किंग व्यवस्थेचा उद्देश :
पारंपरिक पद्धतीमुळे लागणाऱ्या वेळेत कपात करणे
डिजिटल व्यवहारांना तसेच फास्ट टॅगला प्रोत्साहन देणे
💥 जगातील सर्वात उंच वाळूचा किल्ला : World's tallest Sand-Castle
![]() |
world's tallest Sand-Castle |
सध्या चर्चेत असलेला वाळूचा किल्ला, जो डेन्मार्क या देशात बांधण्यात आलेला आहे. या किल्ल्याची उंची 21.16 मीटर इतके असून जगातील सर्वात उंच वाळूचा किल्ला म्हणून गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.
या आधी जर्मनीत बांधण्यात आलेल्या वाळूच्या किल्ल्याची उंची 17.66 मीटर आहे म्हणजेच सध्या डेन्मार्कमध्ये बांधण्यात आलेला किल्ला 3.5 मीटर इतक्या उंचीने अधिक आहे.
हा किल्ला एक उत्तम, सुंदर स्थापत्य कलेचा नमुना आहे. या किल्ल्याचा आकार साधारणतः त्रिकोणी आहे.
या सर्वात उंच किल्ल्यावर कोरोना विषाणू आणि या विषाणूमुळे उद्भवलेली भयावह परिस्थितीचे प्रतिकृती दर्शवण्यात आली आहे.
0 टिप्पण्या