राष्ट्रीय भालाफेक दिवस
नीरज चोप्राने 07 ऑगस्ट रोजी टोकिया ऑलम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्याची किमया केली. या किमयाच्या पार्श्वभूमीवर 07 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय भालाफेक दिवस म्हणून साजरा केला जाईल, असे भारतीय ऍथलेटिक्स महासंघाने जाहीर केले.
![]() |
Neeraj Chopra : Tokyo Olympic 2021 |
या दिवशी संपूर्ण भारतात विविध पातळ्यांवरील स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल. याशिवाय आर्थिक परिस्थिती उत्तम नसूनही स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक असलेल्यांना मोफत भाला दिला जाईल असे महासंघाने स्पष्ट केले.
लिओनेल मेसी : सेंट - जर्मेनेशी करारबद्ध
विश्वातील सर्वोत्तम फुटबॉलपटू म्हणून ख्याती असणारा मेसीने हजारो चाहात्याच्या साक्षीने 👉सेंट - जर्मेन संघात प्रवेश केला.
![]() |
Lionel Messi |
तब्बल 17 वर्षे बर्सिंलोनो संघाकडून खेळल्यानंतर मेसी आता 4 कोटी 10 लाख डॉलर रकमेला सेंट जर्मेनेशी करारबद्ध झाला आहे.
हा दोन वर्षीय करार असल्याने पुढील दोन वर्षासाठी मेसी फ्रांसमधील सेंट जर्मेन क्लबकडून खेळताना दिसेल.
👉पण लक्षात ठेवा :
लिओनेल मेसी हा आंतरराष्ट्रीय पातळीवर अर्जेन्टीना देशाचे प्रतिनिधित्व करतो.
0 टिप्पण्या