राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
👉 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी : 11 ऑक्टोबर
👉 जन्म : यावली शहीद या गावी अमरावती जिल्ह्यात 30 एप्रिल 1909 रोजी
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी स्वातंत्र्य लढ्यात (भारत छोडो आंदोलनात) तसेच राष्ट्रकार्यात आणि सामाजिक कार्यात (जसे आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत) सक्रिय सहभागी झाले.
भारत हा खेड्यांचा देश आहे. हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल, अशी त्यांची विचारसरणी होते. यासाठी महाराजांनी खेडेगाव स्वयंपूर्ण कसे होईल याविषयीची जी उपाययोजना सुचविली होती, ती अतिशय परिणामकारक ठरली.
👉 सन 1935 मध्ये मोझरी येथे "गुरुकुंझ" आश्रमाची स्थापना केली.
👉 'खंजिरी भजन' हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे प्रमुख वैशिष्ट्य.
👉 आत्मसंयमनाचे विचार त्यांनी "ग्रामगीता" या काव्यसंग्रहातून मांडले. मराठी व हिंदी भाषांमध्ये तुकडोजी महाराजांनी काव्यरचना केली.
👉 शेवटी महत्त्वाचे, तुकडोजी महाराजांची क्रियाशीलता आणि वैचारिक एवढी प्रभावशाली होती की, त्यावेळचे राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी "राष्ट्रसंत" या उपाधीने सन्मानित केले.
0 टिप्पण्या