चालू घडामोडी Chalu ghadamodi-Current affairs 13 july 2022 in Marathi
मदर तेरेसा स्मृती पुरस्कार २०२१
पर्यावरण सेवा ही ईशसेवा असून त्यातून माणसाला आत्मिक समाधान लाभते.
पर्यावरण रक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारी अभिनेत्री दिया मिर्झा, तसेच मुंबईतील वर्सोवा सागरीकिनारा स्वच्छता मोहिमेचे नेतृत्व करणारे पर्यावरण कार्यकर्ते अफरोज शहा यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे 'मदर तेरेसा स्मृती पुरस्कार २०२१' प्रदान करण्यात आले.
पुरस्काराचे स्वरूप : पुरस्काररूपात दिया मिर्झा व अफरोजशहा यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.
कार्यक्रमाला हार्मनी फाऊंडेशनचे अध्यक्ष अब्राहम मथाई, सुसान अब्राहम, सानिया शेट्टी उपस्थित होते.
दिया मिर्झा व अफरोज शहा यांच्यासारख्या प्रसिद्धव्यक्तींनी पर्यावरण संवर्धन कार्यात पुढाकार घेतल्यामुळे अनेक युवक पर्यावरण रक्षण-संवर्धनाच्या कार्याशी जोडले जातील, असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला.
कॉ. गोविंद पानसरे प्रबोधन पुरस्कार २०२२
प्रा. हरी नरके यांना कॉ. गोविंद पानसरे प्रबोधन पुरस्कार जाहीर.
प्रा. हरी नरके यांना २०२२ सालचा 'कॉ. गोविंद पानसरेप्रबोधन पुरस्कार' घोषित करण्यात आला आहे. ज्येष्ठ विचारवंत डॉ.रावसाहेब कसबे, डॉ. गोपाळ गुरू, उद्धव कांबळे यांच्या निवड समितीने सदर पुरस्कार जाहीर केला.
२०२१ सालचा कॉ. गोविंद पानसरे पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत गेल ऑम्बेट यांना मरणोत्तर जाहीर करण्यात आला, तर २०२२ सालचा कॉ. पानसरे प्रबोधन पुरस्कार ज्येष्ठ लेखक व विचारवंत प्रा. हरी नरके यांना जाहीर झाला आहे. या पुरस्कारांचे वितरण नाशिक येथे होणार आहे.
पुरस्काराचे स्वरूप : २५ हजार रुपये व स्मृतीचिन्ह आहे.
या अगोदर कॉ. मुक्ता मनोहर, दत्ता देसाई आदी मान्यवरांना हे पुरस्कार देण्यात आले आहेत.
राष्ट्रीय खनिज पुरस्कार
खनिज क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी महाराष्ट्राला केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमितशहा यांच्या हस्ते राष्ट्रीय खनिज पुरस्कार प्रदान करण्यात आला. यासोबतच राज्याला २ कोटी ७ लाख ३४ हजार ३७५ रुपयांची प्रोत्साहन राशी प्रदान करण्यात आली.
केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्रालयाच्यावतीने येथील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये आयोजित ६ व्या खाण व खनिज संमेलनात हे पुरस्कार व प्रोत्साहन राशी वितरित करण्यात आली. यावेळी केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्री प्रल्हाद जोशी, राज्यमंत्री रावसाहेब दानवे, विभागाचे सचिव आलोक टंडन उपस्थित होते.
या समारंभात वर्ष २०१९-२० आणि २०२०-२१ करता एकूण तीन श्रेणींमध्ये प्रत्येकी ३ राष्ट्रीय खनिज विकास पुरस्कार प्रदान करण्यात आले. खनिज श्रेणीत महाराष्ट्राला तिसर्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
६ पंचतारांकित खाणींनाही पुरस्कार :
या समारंभात केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्री प्रल्हाद जोशी आणि राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते देशातील ४० खाणींना उत्कृष्ट कार्वासाठी गौरवण्यात आले. महाराष्ट्रातील ६ खाणींचा यात समावेश आहे. यात
- भंडारा जिल्ह्यातील चिकला मँगनीज खाण,
- गोंदिया जिल्ह्यातील धोबीतोला लोखंड खनिज खाण,
- नागपूर जिल्ह्यातील गुमगाव आणि कांद्री मँगनीज या दोन खाणी,
- चंद्रपूर जिल्ह्यातील माणिकगड आणि नावकरी या दोन चुनखडी खाणींना गौरवण्यात आले.
0 टिप्पण्या