Free Online Chess Class ( Limited seats )

Free Online Chess Class ( Limited seats )

68th National Film Awards / ६८ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

 68th National Film Awards 


daily current affairs in marathi for mpsc

राजधानी दिल्लीत शुक्रवारी ६८वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडला. विज्ञान भवनात आयोजित सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. हिंदी सिनेसृष्टीवर ५ दशके अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना भारतीय सिनेमा सृष्टीतील सर्वोच्च सन्मान असलेल्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सिनेसृष्टीतील योगदानाबद्दल मला हा पुरस्कार दिल्याबद्दल मी सगळ्यांची आभारी, अशा शब्दांत आशा पारेख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

google : Dadasaheb-Phalke-Award-2022


यंदा 'गोष्ट एका पैठणीची' हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्काराचा मानकरी ठरला. तर 'मी वसंतराव देशपांडे' या चित्रपटासाठी शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांना पार्श्वगायनाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. 'गोदाकाठ' आणि अवांछित' या चित्रपटांसाठी किशोर कदम यांना विशेष ज्युरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 

 ६८ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 

 current affairs for mpsc in marathi 

'टकटक' या चित्रपटासाठी अनिश मंगेश गोसावीला सर्वोत्कृष्ट बालकलाकार आणि सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार देण्यात आला. तर 'सुमी' या चित्रपटासाठी आकांक्षा इंगळे आणि दिव्येश इंदूलकर यांनी सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार पटकावला. 'सुमी' हा सर्वोत्कृष्ट बालचित्रपट पुरस्काराचादेखील मानकरी ठरला. 


तामिळ भाषिक 'सोरारई पोटुरू' सिनेमाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या चित्रपटासाठी अभिनेता सूर्या आणि 'तान्हाजी' चित्रपटासाठी अभिनेता अजय देवगणला संयुक्तरीत्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 'सोरारई पोटुरू'ने सर्वोत्कृष्ट स्क्रीन प्ले, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाच्या पुरस्कारांसह एकूण पाच राष्ट्रीय पुरस्कार पटकावले. 
जून, गोदाकाठ, अवांछित या मराठी चित्रपटांनी उल्लेखनीय फिल्मचे पुरस्कार मिळवले. 

 परीक्षाभिमुख माहिती : 

 today mpsc current affairs in marathi 
  • दिल्लीत ६८ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा पार
  • राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान
  • ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना भारतीय सिनेमासृष्टीतील सर्वोच्च सन्मान असलेल्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित
  • सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार - 'गोष्ट एका पैठणीची'
  • सर्वोत्कृष्ट चित्रपट - तामिळ भाषिक 'सोरारई पोटुरू' सिनेमाला
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार - 'सोरारई पोटुरू' चित्रपटासाठी अभिनेता सूर्या आणि 'तान्हाजी' चित्रपटासाठी अभिनेता अजय देवगणला संयुक्तरीत्या




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या