Free Online Chess Class ( Limited seats )

Free Online Chess Class ( Limited seats )

Daily Chalu-ghadamodi 21 Oct 2022

 Daily Chalu-Ghadamodi 21 Oct 2022 


 राजकीय घडामोडी    आंतरराष्ट्रीय घडामोडी 
 

 ब्रिटनमध्ये पुन्हा राजकीय भूकंप : पंतप्रधान लिझ ट्रस यांचा राजीनामा 


आर्थिक संकटावरून वाढता दबाव आणि पक्षांतर्गत बंडखोरीमुळे ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनी अवघ्या ४५ दिवसांतच आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला.
जनादेशाचे पालन करण्यात अपयशी ठरल्याचे सांगत ट्रस यांनी गुरुवारी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. ब्रिटनच्या इतिहासातील सर्वात कमी कालावधीच्या त्या पंतप्रधान ठरल्या. 

daily chalu ghadamodi current affairs oct 2022
Uk pm Liz Truss resigns after 45 days


नवीन नेतृत्वाची निवड होईपर्यंत त्या काळजीवाहू पंतप्रधान म्हणून काम पाहतील. 
निर्माण झालेल्या या राजकीय संकटात पंतप्रधान पदासाठी आता भारतवंशीय नेते ऋषी सुनक यांची दावेदारी बळकट मानली जात आहे. यासोबतच बोरिस जॉन्सन देखील पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी इच्छुक आहेत. 
दरम्यान, विरोधी मजूर पक्षाने मात्र पक्षांतर्गत नेतृत्व बदलाऐवजी मध्यावधी निवडणूक घेण्याची नव्याने मागणी केली आहे.
 
 मागोवा 

सत्ताधारी हुजूर पक्षाच्या नेत्या लिझ ट्रस यांनी ब्रिटनच्या ५६ व्या पंतप्रधान म्हणून ६ सप्टेंबर रोजी पदभार स्वीकारला होता. ट्र्स या ब्रिटनच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान होत्या. यापूर्वी मागरिट थेचर आणि थेरेसा मे यांनी पंतप्रधानपद सांभाळले होते. 

सत्ता हाती घेतल्यानंतर ट्रस यांच्यासमोर ब्रिटनची अर्थव्यवस्था रुळावर आणण्याचे मोठे आव्हान होते. परंतु आर्थिक संकट वाढत चालल्याने त्यांच्यावर सातत्याने पक्षांतर्गत दबाव वाढत चालला होता. अनेक खासदार उघडपणे ट्रस यांच्यावर टीका करत होते.

 Daily Current affairs oct 2022 

त्यामुळे अखेर त्यांनी पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला. १० डाऊनिंग स्ट्रीट या सरकारी निवासस्थानासमोरून अखेरच्या वेळेस पंतप्रधान म्हणून भाषण करताना त्यांनी राजीनाम्या पाठीमागील कारण स्पष्ट केले. जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात मी अपयशी ठरत आहे. आपल्याला मिळालेल्या जनादेशावर खरे उतरण्यात अपयशी ठरल्याने पदाचा राजीनामा देत असल्याच्या त्या म्हणाल्या. 

ट्र्स यांनी परंपरेनुसार ब्रिटनचे महाराजा चार्ल्स तृतीय यांनाही आपल्या निर्णयाबाबत कळवले. हुजूर पक्षाच्या स्पेशल रूल समिती १९२२ चे अध्यक्ष सर ग्राहम ब्रेडी यांची भेट घेऊन ट्रस यांनी राजीनाम्याबाबत सांगितले. नव्या नेतृत्वाची निवड होईपर्यंत ट्स काळजीवाहू पंतप्रधान राहतील.

टूस यांच्या राजीनाम्यानंतर पंतप्रधान पदासाठी भारतवंशीय नेते ऋषी सुनक आघाडीवर असल्याचे मानले जात आहे. परंतु सत्ताधारी पक्षातील रस्सीखेच पाहता अद्याप यासंबंधीचे चित्र पूर्णपणे स्पष्ट नाही. २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत मिळालेल्या प्रचंड जनादेशाचा हवाला देत काही खासदार माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याकडे पुन्हा सत्ता सोपवण्याची मागणी करत आहेत. विशेष म्हणजे जॉन्सन यांना देखील पक्षांतर्गत दबावामुळेच यंदा जुलै महिन्यात राजीनामा द्यावा लागला होता.

 योजना    राज्यस्तरीय घडामोडी 

 महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ 

राज्यातील ७ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये
२० ऑक्टोबर, २०२२ रोजीच्या कार्यक्रमात मा. मुख्यमंत्री व मा. उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ६ लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे रु. २५०० कोटी रक्कम थेट जमा.

daily current affairs oct 2022
Mahatma Jyotiba Phule yojana 2022

 योजनेची वैशिष्ट्ये 

  • राज्यातील अल्पमुदतीच्या पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना रु. ५० हजारपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा ऐतिहासिक निर्णय.
  • नियमित पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देणारे व एकाचवेळी थेट खात्यात रक्कम जमा करणारे महाराष्ट्र हे देशांतील पहिले राज्य.
  • प्रोत्साहनपर लाभ योजनेची संपूर्ण अंमलबजावणी ऑनलाईन पद्धतीद्वारे.
  • २०१७-१८, २०१८-१९ व २०१९-२० या पैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षांत पीक कर्जाची उचल घेऊन नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ.
  • राज्यात झालेल्या अतिवृष्टी व महापूरामुळे नुकसान झाल्या नैसर्गिक आपत्ती अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी सुद्धा योजनेस पात्र.
  • शेतकरी मयत झाल्यानंतर त्यांच्या वारसांनी कर्जाची परतफेड केली असल्यास वारस सुद्धा प्रोत्साहनपर योजनेच्या लाभास पात्र.
  • राज्यातील अंदाजे १६ लाख पात्र शेतकऱ्यांना रु.४७०० कोटी प्रोत्साहनपर लाभ देण्याचे प्रस्तावित. उर्वरित सर्व पात्र लाभार्थ्यांना नोव्हेंबर २०२२ अखेर लाभ देण्यास राज्यशासन कटिबद्ध
 Daily Current affairs Oct 2022 

८ लाख शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकांचे प्रमाणीकरण 
  • योजनेचा लाभ देण्यासाठी पात्र शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकांचे प्रमाणीकरण करण्यात आले असून सध्या सुमारे ८ लाख शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकांचे प्रमाणीकरण झाले आहे. 
  • त्यापैकी ६ लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या खात्यात गुरुवारी थेट रक्कम जमा करण्यात आल्याचे सहकार मंत्री सावे यांनी सांगितले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या