Free Online Chess Class ( Limited seats )

Free Online Chess Class ( Limited seats )

Mpsc Current affairs / Chalu ghadamodi 05th Nov 2024

Mpsc Current affairs / Chalu ghadamodi 05th Nov 2024

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी आज मतदान


कमला हॅरिस-डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चुरशीची लढत 

अवघ्या जगाचे लक्ष लागलेल्या अमेरिकेच्या ४७ व्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज मंगळवारी मतदान होणार आहे. राष्ट्राध्यक्षपदासाठी डेमोक्रॅटिक पक्षाकडून ६० वर्षीय भारतवंशीय कमला हॅरिस तर रिपब्लिकन पक्षाकडून ७८ वर्षीय माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात लढत होत आहे. 

दोन्ही नेत्यांनी अखेरच्या क्षणापर्यंत प्रचाराचा धुराळा उडवत आपापल्या विजयाचा दावा केला आहे. मतदानानंतर लगेचच मतमोजणीला सुरुवात होणार असली तरी प्रत्यक्ष निकाल हाती येण्यासाठी दोन ते तीन दिवस लागण्याची शक्यता आहे. दीर्घकाळ चालणारी ही निवडणूक आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

 

Chalu-ghadamodi-USA-election-2024
US-election-2024


डेमोक्रॅटिककडून विद्यमान उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस आणि रिपब्लिकनकडून माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मैदानात आहेत. निवडणुकीत जर हॅरिस या विजयी झाल्या तर त्या अमेरिकेच्या इतिहासातील पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष ठरतील. इतकेच नाही, तर पहिल्या कृष्णवर्णीय व आशियाई अमेरिकन राष्ट्राध्यक्ष असतील. ट्रम्प विजयी झाले तर गत निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर पुन्हा जिंकणारे १९ व्या शतकानंतरचे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरतील.


गेल्या निवडणुकीत डेमोक्रॅटिकच्या जो बायडेन यांनी ३०६ इलेक्टोरल मते मिळवली होती. तर ट्रम्प यांना २३२ मतांवर समाधान मानावे लागले होते.


न्यूयॉर्कमधील मतपत्रिकेवर बंगाली भाषा 

"अमेरिकेतील सर्वात मोठ्या बहुभाषिक न्यूयॉर्कमध्ये जवळपास २०० हून अधिक भाषा बोलल्या जातात; पण अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदासाठी होत असलेल्या निवडणुकीत मतपत्रिकेवर इंग्रजीशिवाय अन्य चार भाषांना स्थान देण्यात आले आहे. यामध्ये बंगाली ही एकमेव भारतीय भाषा आहे. तर अन्य भाषांमध्ये चिनी, स्पॅनिश आणि कोरियाई भाषेचा समावेश आहे.


Mpsc Current affairs 05th Nov 2024


अशी असते निवडणूक प्रक्रिया


अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठीची निवडणूक ही नेहमी नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या सोमवारनंतरच्या मंगळवारी होत असते. 


जरी सामान्य मतदार कोणा एका उमेदवाराला मतदान करणार असला तरी त्यांची मते थेट उमेदवाराला मिळत नाहीत. तर राज्यांना देण्यात आलेल्या 'इलेक्टोरल कॉलेज व्होट्सवर विजयी उमेदवार घोषित केला जातो. 


अमेरिकेतील प्रत्येक राज्याला तिथल्या लोकसंख्येनुसार काही 'इलेक्टोरल कॉलेज व्होट्स' देण्यात आली आहेत. 

अमेरिकेतील ५० राज्यांत लोकसंख्येनुसार एकूण ५३८ इलेक्टोरल मते आहेत. ज्या उमेदवाराला २७० पेक्षा जास्त इलेक्टोरल मते मिळतात, त्याला विजयी घोषित केले जाते. यात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या कॅलिफोर्नियाकडे ५५ इलेक्टोरल मते आहेत. 

जर उमेदवारांना विजय साध्य करायचा असल्यास काही राज्यांतील मते मिळवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या राज्यांना 'स्विंग स्टेट्स' म्हणून ओळखले जाते. यामध्ये अॅरिझोना, जॉर्जिया, मिशिगन, नेवादा, नॉर्थ कॅरोलिना, पेनसिल्व्हेनिया आणि विस्कॉन्सिन या ७ राज्यांचा समावेश आहे. 

मतदान प्रक्रियेनुसार एखाद्या राज्यात ज्या उमेदवाराला सर्वाधिक पसंतीची मते मिळतात, त्याच्या खात्यामध्ये त्या राज्यासाठीची सर्व इलेक्टोरल व्होट्स जमा होतात. अमेरिकेतील दोन राज्ये वगळता इतर सर्व राज्यांमध्ये हा नियम आहे. त्यामुळे उमेदवाराचा विजय हा इलेक्टोरल मतांवर अवलंबून असतो. 


त्यामुळे देशभरातून सर्वात जास्त पसंती मते मिळवणारा उमेदवार विजयी ठरतोच असे नाही. कारण २०१६ च्या निवडणुकीत डेमोक्रॅटिकच्या हिलरी क्लिंटन यांच्यासोबत हा प्रकार घडला होता. देशपातळीवर विचार करत क्लिंटन यांना ट्रम्प यांच्यापेक्षा अधिक मते मिळाली होती; पण त्यांना २७० 'इलेक्टोरल व्होट्स मिळवता आली नसल्याने त्यांचा पराभव झाला होता.


मध्य रेल्वेचे ७४ वे वर्ष सुरू


आजपासून मध्य रेल्वेचे ७४ वे वर्ष सुरू होत आहे. भारतातील पहिली ट्रेन मुंबई ते ठाणे दरम्यान १६ एप्रिल १८५३ रोजी धावली. जसजशी वर्षे सरत गेली, तसतसा ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेचा विस्तार होत गेला. ५ नोव्हेंबर १९५१ रोजी निजाम राज्य, सिंधिया राज्य आणि ढोलपूर राज्य रेल्वेचे, ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेसह एकत्रीकरण करून मध्य रेल्वेची स्थापना करण्यात आली. आज मध्य रेल्वे सर्वाधिक व्यस्त मार्गांपैकी एक आहे.


सध्या मध्य रेल्वेवर मुंबई, भुसावळ, नागपूर, सोलापूर आणि पुणे असे ५ विभाग आहेत. मध्य रेल्वेचे नेटवर्क महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटक राज्यांमध्ये ४,२१९ मार्ग किमीवर पसरलेले असून एकूण ४९२ स्थानके मध्य रेल्वेवर आहेत. 


Mpsc Current affairs 05th Nov 2024


मध्य रेल्वेने गेल्या ७३ वर्षांत अनेक कामगिरी प्रथमतः केल्या आहेत. यामध्ये पहिली शताब्दी एक्स्प्रेस, पहिली जनशताब्दी एक्स्प्रेस, पहिली तेजस एक्स्प्रेस मध्य रेल्वे विकासात सतत आघाडीवर आहे. 

मुंबईकरांसाठी मध्य रेल्वे सर्वाधिक महत्त्वाची मुंबईची उपनगरीय सेवा ही मुंबईची जीवनवाहिनी आहे


मध्य रेल्वेवर निर्मितीच्या वेळी मूळ लोडिंग जी १६.५८ मेट्रिक टन होती, ती आता २०२३-२४ मध्ये ८९.२४ दशलक्ष टन झाली आहे, जी मध्य रेल्वेच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वोत्तम लोडिंग आहे. प्रवासी वाहतुकीबाबत सांगायचे झाले तर १९५१ मध्ये, मध्य रेल्वेने २२४ दशलक्ष प्रवाशांची वाहतूक केली, जी २०२३-२४ या आर्थिक वर्षात १५८३ दशलक्ष प्रवासी झाली आहे.



Mpsc Current affairs 05th Nov 2024


आज मराठी रंगभूमी दिन : ५ नोव्हेंबर


१८४३ साली सीता स्वयंवर या नाटकाच्या रूपात सुरु झालेला हा प्रवास अलीकडच्या संगीत देवबाभळी, अनन्या, अलबत्त्या गलबत्त्या पर्यंत दिवसागणिक आणखीनच प्रगल्भ होत चालला आहे. मराठी रंगभूमीच्या सेवेत रुजू असणाऱ्या प्रत्येक रंगकर्मीसाठी ५ नोव्हेंबर हा दिवस अतिशय महत्वाचा आहे. या दिवशी मराठी रंगभूमी दिन साजरा केला जातो. 


१८४३ मध्ये सांगली येथे मराठी रंगभूमीचा पाया रचला गेला. चिंतामणराव पटवर्धन यांच्या आश्रयात विष्णुदास भावे यांनी ५ नोव्हेंबर १८४३ साली सीता स्वयंवर या नाटकाचा प्रयोग केला आणि तिथूनच मराठी नाटकांच्या पर्वाला सुरुवात झाली. 

१९४३ साली या दिवसाच्या स्मरणार्थ म्हणून या क्षेत्रातील सर्व नामवंत कलाकारांनी एकत्र येऊन सांगली येथे ५ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत शताब्दी महोत्सव साजरा केला. या संमेलनाचे अध्यक्ष वि.दा. सावरकर हे होते. याच दिवशी नाट्यविद्येच्या संवर्धनासाठी अखिल महाराष्ट्र नाट्यविद्या मंदिर समिती स्थापन दैनंदिनी करण्यात आली. यावेळी सर्व नाट्य रसिकांच्या साक्षीने सांगली येथे समितीने ठराव करून हा दिवस मराठी रंगभूमी दिन म्हणून घोषित करण्यात आला होता. 


दरवर्षी यादिवशीच रंगभूमीची प्रदीर्घ काळ सेवा करणाऱ्या कलावंताला विष्णुदास भावे पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या