2060 पर्यंत कार्बन न्यूट्रल देश : चीन
चीनने मागील काही दशकांत आश्चर्यकारकरित्या औद्योगीकरणात प्रगती केली आहे.
त्याचे फलितरूप म्हणजेच चीन कारखान्याचा देश बनला. त्यामुळे सध्या चीन, एक समृद्ध व संपन्न देश बनला आहे.
पण, याबरोबरच चीन मोठ्याप्रमाणात CO2 उत्सर्जन करणारा देश सुद्धा बनला. या कारणामुळे चीनला 2060 पर्यंत कार्बन न्यूट्रल देश बनण्याचा निर्धार करावा लागला आहे.
🤔🤔 कार्बन न्यूट्रल म्हणजे काय ?
👉 जेवढे होईल तेवढे CO2 उत्सर्जनामध्ये कमी आणणे.
👉 यासाठी CO2 उत्सर्जन करणाऱ्या इंधनांचा किंवा संसाधनांचा वापर करणे टाळणे.
👉 त्याऐवजी सौरऊर्जा, पवनऊर्जा, याप्रकारच्या नवीकरणीय ऊर्जा स्रोतांचा मोठ्या प्रमाणात उपयोगात आणणे आवश्यक आहे.
विश्व हत्ती दिवस
जगभरात 12 ऑगस्ट ला 'विश्व हत्ती दिवस' साजरा केला गेला. पहिल्यांदा हा दिवस 12 ऑगस्ट 2012 रोजी साजरा करण्यात आला.
विश्व हत्ती दिवस हा त्यांच्या संरक्षणाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी केंद्रित आहे.
हत्तीचे, विशेष रूपाने आशियाई आणि आफ्रिकी हत्तींचे मोठ्या प्रमाणात अवैध शिकार करण्यात येते, जड वाहतूक कामाच्या ठिकाणी दुर्व्यवहार केले जातात. तसेच वेगवेगळ्या सरकारी प्रोजेक्ट मुळे त्यांचे निवासस्थान व अधिवास नष्ट झालेले आहेत.
या वाईट परिस्थितीवर जागरुकता निर्माण करण्यासाठी वा प्रकाश टाकण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
0 टिप्पण्या