'सूर्यघर'मध्ये महाराष्ट्र देशात दुसऱ्या स्थानी
'पंतप्रधान सूर्यधर योजने'त १० लाख ९ हजार घरांवर सौर ऊर्जा प्रकल्पांची उभारणी पूर्ण झाली असून, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर आहे. राज्यात एक लाख ९२ हजार ९३६ घरांच्या छतांवर हे प्रकल्प उभारण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. आगामी काळातही महाराष्ट्र आपले महत्त्वपूर्ण योगदान देत राहील, असे फडणवीस यांनी नमूद केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली देशात 'पंतप्रधान सूर्यघर योजने'चा शुभारंभ १३ फेब्रुवारी २०२४ रोजी करण्यात आला. या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत १० मार्च २०२५ पर्यंत देशभरात एकुण १०.०९ लाख सौर ऊजां प्रकल्पांचे काम पूर्ण झाले असून, हा एक ऐतिहासिक टप्पा ठरल्याचे बोलले जात आहे. देशात २०२६-२७ पर्यंत १ कोटी कुटुंबांपर्यंत ही योजना पोहोचविण्याचे उदिष्ट आहे.
एकनाथ शिंदेंना संत तुकाराम महाराज पुरस्कार
जगगुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या ३७५ व्या बीज सोहळ्यानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 'श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार' प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा देहू संस्थानचे अध्यक्ष हभप पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी केली.
या पुरस्कारांतर्गत एकनाथ शिंदे यांना वैभवी पगडी, शाल, उपरणे, वीणा, चिपळ्या, पुष्पहार, संत तुकाराम महाराज मूर्ती, संत गाथा आणि सन्मानपत्र प्रदान करण्यात येणार आहे. शिंदे यांनी पंढरपूर वारीदरम्यान वारकऱ्यांच्या सेवा-सुविधांसाठी घेतलेल्या विशेष प्रयत्नांची आणि 'निर्मल वारी, हरित वारी' संकल्पनेत दिलेल्या योगदानाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. हा सन्मान २५ वर्षांपूर्वी माजी मुख्यमंत्री शरद पवार यांना देण्यात आला होता, असे मोरे यांनी सांगितले.
ज्येष्ठ अभिनेते देब मुखर्जी यांचे निधन
ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक अचान मुखर्जी याचे वडील देब मुखर्जी यांचे शुक्रवारी निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सायंकाळी जुहू येथील पवनहंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध मुखर्जी घराण्याचे सदस्य असलेल्या देव मुखर्जी यांना अखेरचा निरोप देण्यासाठी त्यांची पुतणी अभिनेत्री काजोल हिच्यासाह अयानचे अनेक सहकलाकारही उपस्थित होते.
१९६०-७० च्या दशकात देब मुखर्जी यांनी सहाय्यक अभिनेता म्हणून हिंदी चित्रपटात काम करावला सुरुवात केली. 'तू ही मेरी जिंदगी', 'अभिनेत्री', 'अधिकार', 'मै तुलसी तेरे आंगन को', 'बातों बातों में', 'जो जिता वही सिकंदर', अशा निवडक चित्रपटांमधून त्यांनी भूमिका केल्या होत्या, हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर त्यांना अंतिम निरोप देण्यासाठी स्मशानभूमीत उपस्थित होते.
0 टिप्पण्या