Short Notes : January 2026 Weekly Current Affairs Marathi

Short Notes : January 2026 Current Affairs Marathi


सेम्मोज़ि इलक्किय विरुधु – ( शुद्ध भाषा साहित्य पुरस्कार )

  • तमिळनाडू सरकारने भारतीय साहित्य क्षेत्रात नवी पहल केली.
  • मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी अंतरराष्ट्रीय पुस्तक मेळ्याच्या समारोप समारंभात हा पुरस्कार जाहीर केला.
  • हिंदी वगळता इतर 7 भारतीय भाषांतील उत्कृष्ट साहित्यिक कृत्यांना सन्मानित करेल.
  • निवड प्राचीन आणि समृद्ध साहित्यिक परंपरेच्या आधारावर.
  • भविष्यात इतर भाषांपर्यंत विस्तार शक्य.

पुरस्काराची वैशिष्ट्ये

  • दरवर्षी दिला जाणारा राष्ट्रीय स्तराचा पुरस्कार.
  • प्रत्येक भाषेत निवडलेल्या लेखकाला ₹5 लाख रोख रक्कम.
  • उद्देश: भाषिक मर्यादेपलीकडे साहित्यिक उत्कृष्टतेला मान्यता देणे.
  • पहिल्या टप्प्यातील समाविष्ट भाषा : तमिळ, तेलुगू , कन्नड, मल्याळम, ओडिया, बंगाली, मराठी

लोकपाल स्थापना दिवस

  • भारताची सर्वोच्च भ्रष्टाचारविरोधी संस्था लोकपाल यांचा स्थापना दिवस दरवर्षी 16 जानेवारी रोजी साजरा केला जातो. हा दिवस लोकपाल आणि लोकायुक्त अधिनियम, 2013 मधील कलम 3 लागू झाल्याच्या (16 जानेवारी 2014) स्मरणार्थ पाळला जातो.
  • सार्वजनिक जीवनात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व मजबूत करण्याच्या दिशेने लोकपालची भूमिका यावर चिंतन करण्याची ही एक महत्त्वाची संधी असते.
  • 2026 मध्ये लोकपाल स्थापना दिवसाचे आयोजन नवी दिल्ली येथील लोकपाल कार्यालयात करण्यात आले. या कार्यक्रमाला लोकपाल अध्यक्ष न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर तसेच इतर सदस्य उपस्थित होते.

Short Notes : January 2026 Current Affairs Marathi

विदर्भने रचला इतिहास : प्रथमच विजय हजारे करंडकावर कब्जा

  • भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये विदर्भ संघाने ऐतिहासिक कामगिरी करत प्रथमच विजय हजारे करंडकाचे विजेतेपद आपल्या नावावर कोरले. बेंगळुरू येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात विदर्भने दोन वेळा विजेते ठरलेल्या सौराष्ट्र संघाचा 38 धावांनी पराभव करून जेतेपद मिळवले.
  • ही विजयगाथा विदर्भच्या संतुलित फलंदाजी आणि शिस्तबद्ध गोलंदाजीचे उत्तम उदाहरण ठरली. संपूर्ण स्पर्धे दरम्यान संघाने दाखवलेली सातत्यपूर्ण कामगिरी या विजयातून स्पष्टपणे दिसून आली.
  • सलामीवीर अथर्व तायडेने आपल्या लिस्ट ‘ए’ कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी साकारत 128 धावा केल्या. त्याच्या या शतकी खेळीमुळे विदर्भच्या विजयाची भक्कम पायाभरणी झाली.

जागतिक बौद्ध परिषद 2026 : नवी दिल्ली

Global Buddhist Summit 2026

जागतिक बौद्ध परिषद 2026 : नवी दिल्ली

2nd Global Buddhist Summit 2026



  • आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघ (International Buddhist Confederation) आणि भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या सहकार्याने दुसरे जागतिक बौद्ध परिषदेचे (Global Buddhist Summit) आयोजन 24–25 जानेवारी 2026 रोजी नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे करण्यात येणार आहे. 
  • हे आयोजन समकालीन जागतिक आव्हानांवर बौद्ध दृष्टिकोनातून संवाद वाढवणारे एक महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय व्यासपीठ ठरणार आहे.
  • दुसऱ्या जागतिक बौद्ध परिषदेचा विषय आहे – “ संयुक्त बुद्धिमत्ता, एकात्मिक आवाज आणि परस्पर सह-अस्तित्व ” ( Collective Wisdom, United Voice, and Mutual Coexistence ).
  • 2023 मध्ये आयोजित पहिल्या जागतिक बौद्ध परिषदेचे आयोजकही आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघ (IBC)च होते. या परिषदेचा उद्देश बौद्ध मूल्यांच्या आधारे जागतिक संकटांवर उपाय शोधणे हा आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या