Free Online Chess Class ( Limited seats )

Free Online Chess Class ( Limited seats )

MPSC Civil Judge Junior Division and Judicial Magistrate First Class Preliminary Examiniation 2022 - Advertisement

महाराष्ट्र लोकसेवा आयोग {MPSC}

दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा -२०२२

Civil Judge Junior Division and Judicial Magistrate First Class Preliminary Examiniation 2022 - Advertisement



क्रमांक : सीएमए-०४२३/सीआर-०१/२०२३/जाहिरात जाहिरात क्रमांक : ०२६/२०२३

दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग संवर्गातील ११४ पदांवरील भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शनिवार, दिनांक ०९ सप्टेंबर, २०२३ रोजी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग पूर्व परीक्षा २०२२ 

औरंगाबाद, मुंबई व नागपूर या जिल्हाकेंद्रांवर घेण्यात येईल.

पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुख्य परीक्षेचा दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल.

पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंतच्या कालावधीपर्यंत शासनाकडून सुधारित/अतिरिकत मागणीपत्राद्वारे प्राप्त होणारी सर्व पदे पूर्व परीक्षेच्या निकालासाठी विचारात घेण्यात येतील व अशा सुधारित/अतिरिक्‍त मागणीपत्रांचा तपशील मुख्य परीक्षेच्या अधिसूचनेद्वारे उपलब्ध करुन देण्यात येईल.

प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटींची पुर्तता करणा-या उमेदवारांकडून आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

अर्ज सादर करण्याची प्रक्रिया/कालावधी :-
online पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक १३ जून, २०२३ रोजी २३:५९

पात्रता, वयोमर्यादा, अर्हता, अनुभव, इत्यादी 

For details Download


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या