Daily current affairs in marathi 25th Jan 2026
Daily chalu ghadamodi in marathi 25th Jan 2026
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी (Current Affairs) हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. जवळपास प्रत्येक परीक्षेत या विभागातून १५ ते २५ प्रश्न विचारले जातात. MPSC, UPSC, पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य भरती तसेच इतर शासकीय परीक्षांसाठी “दैनिक चालू घडामोडी”चा नियमित अभ्यास आवश्यक आहे.
या पोस्टमध्ये तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशा मराठी दैनिक चालू घडामोडी, महत्त्वाचे प्रश्न-उत्तर, तसेच परीक्षाभिमुख मुद्दे सोप्या भाषेत मिळतील.
या पोस्टमध्ये तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशा मराठी दैनिक चालू घडामोडी, महत्त्वाचे प्रश्न-उत्तर, तसेच परीक्षाभिमुख मुद्दे सोप्या भाषेत मिळतील.
ले. कर्नल सीता शेळके यांना 'सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार' जाहीर
नैसर्गिक संकटात स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांच्या प्राणाचे रक्षण करणाऱ्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
लेफ्टनंट कर्नल सीता शेळके
- मूळ अहिल्यानगर जिल्ह्यातील गाडीलगावच्या रहिवासी आहेत.
- सीता यांनी आपले मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण अहिल्यानगरमधूनच पूर्ण केले.
- २०१२ मध्ये चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीतून प्रशिक्षण पूर्ण करून त्या भारतीय लष्करात अधिकारी म्हणून रुजू झाल्या.
वायनाडमधील २०२४ मध्ये केरळच्या वायनाडमध्ये भीषण भूस्खलनाची घटना घडली होती. लेफ्ट. कर्नल सीता शेळके यांना बचावकार्यासाठी तैनात करण्यात आले होते. शेळके यांनी अत्यंत प्रतिकूल हवामानात शेकडो नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी बचाव मोहिमेचे नेतृत्व केले.
चूरलमाला येथे १९० फूट लांबीच्या बेली ब्रिजची विक्रमी वेळेत उभारणी करण्याचे श्रेय शेळके यांना जाते. पूल तुटल्यामुळे दुर्गम भागातील गावांशी संपर्क तुटला होता. या पुलामुळे संपर्क करणे सोपे झाले. एवढेच नव्हे तर, कोमात्सु पीसी २१० एक्सकॅव्हेटरचा कल्पक वापर करून त्यांनी अवघ्या चार तासांत तात्पुरता पादचारी पूल तयार केला होता.
0 टिप्पण्या