MPSC ची संयुक्त पूर्व परीक्षा ( combined pre exam, 2020 ) 18 जुलैला की सप्टेंबर महिन्यात ?
राज्यातील सुमारे तीन लाख विद्यार्थी या परीक्षेची आवर्जून वाट पाहत आहेत, मात्र राज्यातील 14 जिल्हे रेडझोनमध्ये आहेत. 14 जिल्ह्यातील कोरोना स्थिती भयावह असल्याने संयुक्त पूर्व परीक्षा सप्टेंबरमध्ये घेण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला आहे.
असा निर्णय घेण्यामागचे कारण म्हणजे जूनमध्ये राज्यात पावसाला सुरुवात होते आणि जुलै-ऑगस्टमध्ये मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह अन्य जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो; त्यामुळे या काळात परीक्षा घेण्यास अशक्य असते.
याशिवाय ऑक्टोंबर मध्ये यूपीएससीच्या परीक्षा होणार आहेत; त्यामुळे combined pre exam ( group B ) सप्टेंबरमध्येच होईल, असे आयोगाचे म्हणणे आहे.
![]() |
combined pre exam 2020 update |
पण या निर्णयात अंशतः बदल होऊ शकतो. कारण, आयोग जिल्हानिहाय कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन lockdown संपुष्टात आल्यानंतर, परीक्षासंदर्भात आपत्ती व्यवस्थापन विभागाला विचारणा केली जाईल. त्यावेळी परीक्षेसाठी पोषक वातावरण असल्यास आणि आपत्ती व पुनर्वसन विभागाची परवानगी मिळाल्यास 18 जुलैला परीक्षा होऊ शकते, असे mpsc ने स्पष्ट केले आहे.
शेवटी कोरोनाची परिस्थिती पाहून संयुक्त पूर्व परीक्षा 18 जुलैला की सप्टेंबर महिन्यात, याबाबतचा अंतिम निर्णय 15 जून नंतर घेण्यात येईल, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.
0 टिप्पण्या