Mpsc Chalu ghadamodi / Current affairs / चालू घडामोडी Nov. 2024
सरन्यायाधीश पदाची आज घेणार संजीव खन्ना शपथ
न्यायमूर्ती संजीव खन्ना सोमवारी ५१ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सकाळी १० वाजता न्या. खन्ना यांना पद व गोपनीयतेची शपथ देतील. २०१९पासून सर्वोच्च न्यायालयात असलेले खन्ना यांचा अनेक ऐतिहासिक निकालांत सहभाग राहिला आहे.
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड़ निवृत्त झाल्यामुळे न्या. खन्ना पदभार स्वीकारणार आहेत. Mpsc Chalu ghadamodi Nov. 2024
'UPI' मुळे ATM धोक्यात
नागरिकांची कॅश बाळगण्याची गरज संपली; वर्षभरात ४ हजार एटीएम बंद
भारतात डिजिटल अर्थव्यवस्था वेगाने आकार घेत आहे. यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांचे मजबूत जाळे देशात उभे राहिले आहे. यामुळे देशात यूपीआय पेमेंटचे प्रमाण वेगाने वाढले आहे. लहानमोठी पेमेंटही मोबाइलने करणे शक्य झाल्याने लोकांनी केंश बाळगणे कमी केले आहे. परिणामी एटीएमची संख्या घटल्याचे दिसते.रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) जारी केलेल्या आकडेवारीतून देशातील एटीएम (ATM) च्या संख्येत घट झाल्याचे दिसून येत आहे. या आकडेवारीनुसार सप्टेंबर २०२३ मध्ये देशातील एटीएमची संख्या २,१९,००० इतकी होती.
वर्षभरात सप्टेंबर २०२४ ही संख्या घटून २,१५,००० वर आली आहे. याशिवाय शहरांमध्येही कमी ग्राहक असलेली एटीएम बंद करावी लागली आहेत किंवा त्यांच्या जागा बदलल्या आहेत. यूपीआयची (UPI) लोकप्रियता वाढल्याने एटीएमचा वापर कमी होत असल्याचे यातून अधोरेखित झाले आहे.
RBI ने लागू केलेल्या निर्बंधांचाही फटका
Mpsc चालू घडामोडी Nov. 2024
RBI कडूनही ATM वापरावर शुल्क तसेच इतर बँकांचे एटीएम वापर शुल्क वाढवले. मोफत व्यवहारांवर मर्यादा आणली. यामुळेही एटीएमचा वापर कमी होत गेला आहे.
2022 च्या आर्थिक वर्षात देवाण घेवाणीचे ८९ % व्यवहार रोखीत झाले. कोविड साथीनंतर सरकारने कमी रोकड व डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे धोरण स्वीकारले.
0 टिप्पण्या