ग्रीनलँडवर अमेरिकेचा ताबा? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमागचे राजकारण : Donald Trump’s aggressive foreign policy

ग्रीनलँडवर अमेरिकेचा ताबा? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमागचे राजकारण

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची अरेरावी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अमेरिकेने तेलासाठ्यासाठी व्हेनेझुएला या छोट्याशा देशावर अरेरावी करून त्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांचे अपहरण करून त्यांना अटक केली आणि स्वतःला व्हेनेझुएला या देशाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून घोषित केले. 

त्यानंतर त्यांनी इराणमधील आंदोलनांना हवा देऊन तो देश अस्थिर करण्याचा डाव आखला इतकेच नाही तर इराणवर अमेरिका मोठा हल्ला करेल आणि इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खोमेनी यांना पदच्युत करण्याची धमकी देऊन त्या देशावर अरेरावी केली. 

अमेरिकेच्या या अरेरावीचा संपूर्ण जग निषेध करत असतानाच ट्रम्प यांची नजर अमेरिकेचा शेजारी असलेला ग्रीनलैंड या छोट्या देशावर पडली आणि हा देश देखील आपल्या घशात घालण्याचा निर्णय ट्रम्प यांनी घेतला.

डोनाल्ड ट्रम्प यांचा आता ग्रीनलँडवर डोळा :

ग्रीनलँड हा अमेरिकेचाच एक भाग असून लवकरच ग्रीनलैंड हे अमेरिकेतील नवे राज्य असेल अशी घोषणा केली. ग्रीनलँडने स्वतःहून अमेरिकेत विलीन व्हावे आणि जर ग्रीनलँड स्वतःहून अमेरिकेत विलीन झाला नाही तर अमेरिका लष्करी बळ वापरून त्या देशाला अमेरिकेत विलीन करेल अशी धमकी दिली. 


युरोपचा संताप : डेन्मार्कमध्ये रस्त्यावर उतरलेले आंदोलन

इतकेच नाही तर जे देश ग्रीनलँडचे समर्थन करतील त्या देशांवर अमेरिका जबर आयात शुल्क अर्थात टेरिफ लावेल असा दम देऊन त्यांना ब्लॅकमेल केले. ग्रीनलँडला समर्थन देणाऱ्या युरोपीय देशांना केलेले हे ब्लॅकमेलच आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या ब्लॅकमेलिंग विरुद्ध युरोपात मोठा संताप व्यक्त केला जात आहे. 

ट्रम्प यांच्या या अरेरावी विरुद्ध डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगन आणि इतर शहरात हजारो लोकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले आणि ग्रीनलँड हा विकाऊ देश नाही अशा घोषणा दिल्या. इंग्लंड, फ्रान्स या देशांनी देखील ट्रम्प यांच्या या धोरणावर टीका केली असून डोनाल्ड ट्रम्प यांनी ही अरेरावी थांबवावी असे निवेदन दिले आहे.


Greenland facts for competitive exams
Source : Internet - Greenland is the world’s largest island 



फ्रान्स, इंग्लंडसह युरोपीय देशांची तीव्र टीका :

केवळ युरोपच नव्हे तर संपूर्ण जग अमेरिकेच्या अरेरावी विरुद्ध एकजूट होत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विस्तारवादी धोरणाविरुद्ध दक्षिण अमेरिका खंडातील देशातही मोठी नाराजी आहे. आज या देशांनी जाहीरपणे तसे बोलून दाखवले नसले तरी ते ही डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर नाराज आहेत. 

अमेरिकेतील नागरिकांनाही ट्रम्प यांचे हे विस्तारवादी धोरण मान्य नाही पण ट्रम्प आपली हेकेखोरी सोडायला तयार नाही. काहीही करून आपल्या शेजारी असलेल्या लहान देशांना अमेरिकेत विलीन करून घ्यायचे, तेल संपन्न राष्ट्रांवर ताबा मिळवून तेथील तेलसाठे ताब्यात घ्यायचे. 

जे आपले ऐकणार नाही त्यांच्यावर जबर आयात शुल्क अर्थात टेरीफ लावून त्यांना ब्लॅकमेल करायचे आणि संपूर्ण जगावर आपली एकहाती हुकूमत गाजवायची हे ट्रम्प यांचे धोरण आहे आणि ट्रम्प यांचे हेच विस्तारवादी धोरण जगाला युद्धाच्या खाईत घेऊन जाईल हे मात्र नक्की...



ग्रीनलँड : स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाची माहिती

भौगोलिक माहिती
  • ग्रीनलँड हे जगातील सर्वात मोठे बेट आहे.
  • हे बेट उत्तर अटलांटिक व आर्क्टिक महासागर यांच्या दरम्यान स्थित आहे.
  • भौगोलिकदृष्ट्या हे उत्तर अमेरिका खंडाचा भाग मानले जाते.
  • सुमारे ८०% क्षेत्रफळ बर्फाच्छादित (Ice Sheet) आहे.


राजकीय स्थिती
  • ग्रीनलँड हा डेन्मार्कचा स्वायत्त प्रदेश (Autonomous Territory) आहे.
  • १९७९ मध्ये ग्रीनलँडला स्वशासन (Home Rule) मिळाले.
  • २००९ पासून अधिक स्वायत्त अधिकार (Self-Government Act) मिळाले.
  • संरक्षण व परराष्ट्र धोरण अजूनही डेन्मार्ककडे आहे.


आगामी परीक्षेत विचारले जाऊ शकणारे मुद्दे  ( One-Liners )
  • ग्रीनलँड → जगातील सर्वात मोठे बेट
  • राजकीय दर्जा → डेन्मार्कचा स्वायत्त प्रदेश
  • Ice Sheet → सुमारे 80% क्षेत्रफळ
  • राजधानी → नूक (Nuuk)
  • प्रमुख लोकसमूह → इन्युइट

पुढील लेख :

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या