Free Online Chess Class ( Limited seats )

Free Online Chess Class ( Limited seats )

Mpsc Chalu ghadamodi / Current affairs 12th Nov. 2024

Mpsc Chalu ghadamodi / Current affairs / चालू घडामोडी 12th Nov. 2024

जपानच्या पंतप्रधानपदी पुन्हा शिगेरू इशिबा 

जपानच्या पंतप्रधानपदी लिवरल डेमोक्रेटिक पक्षाचे (एलडीपी) नेते शिगेरू इशिवा यांची पुन्हा एकदा निवड झाली आहे. जपानच्या संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये सर्वाधिक मतं मिळाल्यानंतर इशिबा यांची पंतप्रधानपदी वर्णी लागली आहे. गेल्या महिन्यात देशात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत एलडीपी व कोमिटो यांच्या सत्तारूढ आघाडीने बाहुमत गमावले आहे. 

japan-former-defence-minister


त्यानंतर शिगेरू इशिबा व प्रमुख विरोधी पक्ष डेमोक्रेटिक पक्षाचे नेते योशिहिको नोडा यांच्यात 'रन ऑफ' लढत झाली. यात, मागील ३० वर्षात पहिल्यांदाच मतदान घेण्यात आले असता ६७ वर्षीय इशिबा यांना २२१ मते मिळाली. हा मतांचा आकडा २३३ या बहुमतापेक्षा कमी आहे. परंतु प्रतिद्वंदी नोडा यांच्या तुलनेत त्यांना जास्त मते प्राप्त झाली आहेत. म्हणून इशिवा यांना एकमताने पंतप्रधान महणून निवडण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. 

दरम्यान, आगामी काळात देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय पातळीवर विशेष कामगिरी बजावणे व जनतेची सेवा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याची ग्वाही इशिवा यांनी दिली. शिगेरू इशिवा यांनी गत ऑक्टोबर महिन्याच्या प्रारंभी जपानचे १०२ वे पंतप्रधान महणून सूत्रे स्वीकारली. आपली स्थिती भक्कम करण्याच्या हेतूने तत्काळ निवडणूक घेण्याची घोषणा त्यांनी केली होती. परंतु या निवडणुकीत त्यांना मोठा दणका बसला. महागाई व स्लश फंड घोटाळ्यामुळे मतदारांनी एलडीपीला नाकारले आहे.

Must Read : 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या