Free Online Chess Class ( Limited seats )

Free Online Chess Class ( Limited seats )

Chalu ghadamodi Current affairs Mpsc July 2022

 Mpsc Chalu ghadamodi July 2022  

भारताच्या 'घातक' ड्रोनचे पहिले यशस्वी उड्डाण

 

  • डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) ने प्रथमच स्वायत्त फ्लाइंग विंग टेक्नॉंलॉजी डेमॉन्स्ट्रेटरच्या उड्डाणाची यशस्वी चाचणी केली आहे. 
  • हे उड्डाण कर्नाटकातील चित्रदुर्ग येथील एरोनॉटिकल टेस्ट रेंजवर करण्यात आले.
  • अमेरिकेच्या इ-२ बॉम्बरसारखे दिसणारे हे विमान पूर्णपणे स्वयंचलित असून त्याने स्वत: उड्डाण करून पॉइंट नेव्हिगेशन आणि लँडिंग केले. 
  • मानवरहित विमानांच्या विकासासाठी महत्त्वाचे तंत्रज्ञान सिद्ध करण्याच्या दृष्टीने हे उड्डाण एक मोठे यश आहे. देशाच्या संरक्षणासाठीही हे एक मोठे पाऊल मानले जात आहे.

drdo ghatak drone
Indian_Ghatak_UAV

  • हे विमान बंगळुरूस्थित एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (ए्डीई) ने बनवले असून ते लहान टर्बोफॅम इंजिनसह उडते. बिमानासाठी वापरण्यात येणारी एअरफ्रेम, अंडरकॅरेज आणि संपूर्ण फ्लाइट कंट्रोल आणि एव्हीओनिक्स सिस्टीम स्वदेशी आहे.
  • संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या कामगिरीबद्दल DRDO चे अभिनंदन केले आहे. स्वायत्त विमानाच्या दिशेने ही मोठे पाऊल आहे. यामुळे महत्त्वाच्या लष्करी यंत्रणांच्या रूपाने 'आत्मनिर्भरभारता'चा मार्गही मोकळा होईल, असे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.
  • मानवरहित विमान म्हणजेच यूएव्ही (UAV) हे 21व्या शतकातील युद्धांचा अविभाज्य भाग आहेत. 
  • गेल्या दहा वर्षांत त्यांचा वापर वाढला आहे. गेल्या वर्षी आर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यातील नागोर्नो-काराबाख संघर्षादरम्यान यूएव्हीला मान्यता मिळाली आहे.या विमानाच्या माध्यमातून ड्रोनने युद्धभूमीवर पूर्णपणे वर्चस्व गाजवले जाते. 
  • दहशतवाद्यांना देखील यूएव्ही म्हणजेच हे ड्रोन तंत्रज्ञान मिळत आहे. या ड्रोनच्या माध्यमातून ते हल्ला करतात.

चालू घडामोडी जुलै २०२२

महत्त्वाचे मुद्दे -
  • डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने 'घातक' ट्रोनचे पहिले यशस्वी चाचणी केली.
  • हे उड्डाण चाचणी कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे
  • अमेरिकेच्या इ-२ बॉम्बरसारखे दिसणारे हे विमान पूर्णपणे स्वयंचलित असून मानवरहित विमान
  • हे विमान बंगळुरूस्थित एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (ए्डीई) ने बनवले असून ते लहान टर्बोफॅम इंजिनसह उडते
  • संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या कामगिरीबद्दल डीआरडीओ (DRDO) चे अभिनंदन केले


नीरज चोप्राचा आणखी एक पराक्रम -

रौप्य पदाकावरही कोरले नाव  


Neeraj Chopra silver medal
Neeraj Chopra new record

  • ऑलिम्पिक २०२० नंतर हे त्याचे दुसरे मोठे पदक आहे. ८९.९४ मीटर इतका लांब भाला फेक करत नीरजने पुन्हा विश्वविक्रम केला आहे.
  • गुरूवारी स्टॉकहोममधील प्रतिष्ठित डायमंड लीग मीटमध्ये या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत भारतीय वीराने अनुक्रमे ८९.९४ मी, ८७.४६ मी, ८४.७७ मी, ८६.६७ मी, ८६.४८ मी अंतर पाच फेकण्याच्या प्रयत्नामध्ये कापले.
  • २४ वर्षीय नीरज चोप्रा डायमंड लीगमध्ये पदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला.
  •  ऑलिम्पिकस्पर्धेत ट्रंक आणि फील्ड स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा पहिला भारतीय खेळाडू ठरला. 

 👉👉 Daily Current Affairs in Marathi 3 July 2022 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या