Free Online Chess Class ( Limited seats )

Free Online Chess Class ( Limited seats )

चालू घडामोडी Chalu ghadamodi-Current affairs 12 july 2022 in Marathi

 चालू घडामोडी Chalu ghadamodi-Current affairs 12 july 2022 in Marathi 

 आयएनएस विक्रांतची अखेरची चाचणीही यशस्वी 

mpsc-current-affairs-july-2022-ins-vikrant

१५ ऑगस्टला मिळणार पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका

देशाची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतच्या चौथ्या टप्प्यातील सागरी चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण झाल्या. त्यामुळे आता या युद्धनौकेच्या समावेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत १५ ऑगस्ट रोजी आयएनएस विक्रांत देशसेवेसाठी सज्ज होईल.

  • तब्बल ४० हजार टन वजनी आयएनएस विक्रांतच्या बांधणीत ६० टक्के साहित्य स्वदेशी आहे. 
  • या युद्धनौकेवर ४० विमाने तैनात केली जाऊ शकतात. 
  • कोच्ची शिपयार्ड लिमिटेडने या युद्धनौकेची बांधणी केली आहे.

देशाच्या पहिल्या विमानवाहू युद्धनौका आयएनएस (INS) विक्रांतचा परीक्षाभिमुख माहिती : 👇👇
  • ब्रिटिशांनी वापरलेल्या विमानवाहू युद्धनौकेची डागडुजी जी करून ती १९६१ साली नौदलात सामील करण्यात आली. 
  • देशाच्या या पहिल्या विमानवाहू युद्धनौकेचे नाव आयएनएस विक्रांत होते. 
  • १९९७ साली ही युद्धनौका सेवानिवृत्त झाली.

नौदलात निवृत्त झालेल्या युद्धनौकांचे नाव त्या श्रेणीतील नव्या युद्धनौकांना देण्यात येते. त्यानुसार देशाच्या पहिल्या स्वदेशी विमानवाहू युद्धनौकेला आयएनएस विक्रांत' हे नाव देण्यात आले आहे.

chalu ghadamodi july 2022 👆👇

 जपानमध्ये सत्तारूढ लिबरल डेमोक्रेटिक पक्ष विजयी 

जपानमध्ये घेण्यात आलेल्या संसदीय निवडणुकीत सत्तारूढ लिबरल डेमोक्रेटिक पक्ष व आघाडीतील सहकारी पक्षाने बाजी मारली आहे.

या आघाडीने संसदेच्या वरिष्ठ सभागृहातील २४८ पैकी १४६ जागा जिंकत बहुमत मिळवले आहे. या बरोबरच पंतप्रधान फुमिओ किशिदा हे २०२५ पर्यंत सत्तेत राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

राष्ट्रीय सुरक्षा भक्कम करणे व दीर्घकालीन धोरण ठरवण्याचे त्यांच्यापुढे आव्हान असणार आहे.  
आबेंच्या पश्चात लिबरल पक्षाला बळकट करणे व समर्थकांना एकजूट ठेवण्याची जबाबदारी पंतप्रधान किशिदा यांच्या खांद्यावर आहे.

 भारताच्या अर्जुन बबुताची कमाल 

विश्‍वचषक स्पर्धत साधला सुवर्णपदकाचा निशाणा

भारताचा युवा नेमबाज अर्जुन बबुताने सोमवारी टोकियो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या लुकास कोझेन्स्कीचा पराभव करून पुरुषांच्या १0 मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक जिंकून येथे आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषकात देशाच्या पदकतालिकेचे खाते उघडले. 
सुवर्णपदकाच्या लढतीत अर्जुनने अमेरिकेच्या कोझेन्स्कीचा १७-९ असा सहज पराभव केला.

वरिष्ठ संघासह पंजाबचा २३ वर्षीय अर्जुनचे हे पहिले सुवर्णपदकआहे. याआधी अझरबैजानच्या गबाला येथे २०१६ च्याज्युनियर वर्ल्ड कपमध्ये त्याने सुवर्णपदक जिंकले. अर्जुन हा २०१६ पासून भारताचे प्रतिनिधित्व करत आहे.

current affairs july 2022

 नव्या संसद भवनावर ९५०० किलोंचा अशोकस्तंभ 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या संसदभवनाच्या छतावरील राष्ट्रीय चिन्हाचे सोमवारी अनावरण केले. सोमवारी पंतप्रधानांच्या हस्ते विधिवत पूजा करून या चिन्हाचे अनावरण करण्यात आले. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभा उपसभापती हरिवंश राय, केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी उपस्थित होते. आठ विविध टप्प्यांमधून हे राष्ट्रीय चिन्ह साकारण्यात आले आहे. यासाठी मातीची प्रतिकृती, संगणकावरील मॉडेल तयार करण्यात आले.
यंदाचे हिवाळी अधिवेशन नव्या संसदेत होईल, असा विश्‍वास अधिकार्‍यांनी व्यक्‍त केला. 

  • अशोकस्तंभाची कास्य धातूपासून तयार केलेली 
  • ही प्रतिमा ९५०० किलो वजनी आणि सुमारे २० फूट उंचीची आहे. 
  • नव्या संसदभवनाच्या छतावरील या राष्ट्रीय चिन्हाला आधार देण्यासाठी आसपास ६५०० किलो पोलादाची संरचना बांधण्यात आली आहे. 

विरोधकांनी मात्र राष्ट्रीय चिन्हाचे विधिवत अनावरण केल्याबद्दल टीका केली. संसद, सरकार, न्यायपालिका स्वतंत्रसंस्था असल्याने सरकारचे प्रमुख म्हणून पंतप्रधानांनी संसदेच्या या.कार्यक्रमात सहभागी होणे योग्य नव्हते, असे एमआयएम प्रमुखअसदुद्दीन ओवैसी म्हणाले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या