Free Online Chess Class ( Limited seats )

Free Online Chess Class ( Limited seats )

चालू घडामोडी Chalu ghadamodi-Current affairs 19 july 2022 in Marathi

 चालू घडामोडी Chalu ghadamodi-Current affairs 19 july 2022 in Marathi 


 ज्येष्ठ गायक व गझलकार भूपिंदर सिंह यांचे निधन 


mpsc-current-affairs-july-2022

ज्येष्ठ गायक व गझलकार भूपिंदर सिंह यांचे सोमवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते अनेक आजारांचा सामना करत होते. त्यांना युरिनरी इन्फेक्शनही झाले होते. अखेर सोमवारी मुंबईमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर बॉलीवूडमधील अनेकांनी दुःख व्यक्‍त केले आहे. 
current-affairs-bhupinder-singh-death-july-2022


मौसम, सत्ते पे सत्ता, दुरिया, हकिकत चित्रपटामधील त्यांच्या गाण्यांनी संगीतप्रेमींना भुरळ पाडली. त्यांच्या निधनाने संगीतक्षेत्रात शोककळा पसरली आहे. दर्दभऱ्या आवाजाने पाच दशकांहून अधिक काळ संगीतप्रेमींवर भुरळ घालणार्‍या भूपिंदर सिंह यांची चित्रपटातील 
'दिल ढुंढता हैं फिर वहीं...', 'दो दिवाने शहर में', 'नाम गुम जायेंगा', 'किसीनजर को तेरा इंतजार आज भी है', यांसारख्या गाण्यांमुळे ते संगीतप्रेमींच्या विशेष लक्षात राहिले. 

पंजाबमधील अमृतसरमध्ये ६ फेब्रुवारी १९४० रोजी जन्मलेल्या भूपिंदर यांचे वडिल नाथा सिंहजी देखील गायक होते. वडिलांकडून संगीताचे धडे घेत भूपिंदर यांनी दिल्लीतील ऑल इंडिया रेडिओमध्ये आपल्या गायनाची सुरुवात केली. प्रख्यात संगीतकार मदन मोहन यांनी एका कार्यक्रमात भूपिंदर यांचे गाणे ऐकले आणि त्यांना मुंबईत येण्याचा सल्ला दिला. 

हकिकत चित्रपटातील 'होके मजबूर मुझे उसने बुलाया होगा...' या गाण्यासाठी मोहम्मद रफी, तलत मेहमूद आणि मन्ना डे यांच्यासोबत त्यांना गाण्याची संधी दिली. त्यानंतर खय्याम यांच्या 'आखरी खत' चित्रपटातील त्यांच्या गाण्यांना रसिकांनी दाद दिली. दर्दभर्‍्या आवाजामुळे ते ओळखू लागले. तसेच गझलवर त्यांचे प्रभुत्व असल्याने त्यांनी पार्श्वगायनासह पत्नी मिताली सिंह यांच्या समवेत अनेक गझलांचे कार्यक्रम केले. विदेशातही त्यांचे मोठ्या प्रमाणावर चाहते होते.

 मावळकन्या हर्षदाचे एशियन वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्ण यश 

ताश्कंद येथे सुरु असलेल्या ज्युनिअर एशियन वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत मावळ तालुकयातील हर्षदा गरुड हिने सुवर्ण यश संपादन केले आहे. 

mpsc-current-affairs-harshada-garud-weightlifting

उझबेकिस्तानची राजधानी ताश्कंद येथे १७ जुलै ते २५ जुलै दरम्यान ज्युनिअर एशियन वेटलिफ्टींग स्पर्धा होत आहे. यामध्ये भारतीय संघ देखील सहभागी झाला आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी भारताला सुवर्णपदक मिळवण्यात यश आले. 

४५ किलो वजनी गटात भारताचे प्रतिनिधित्व करताना हर्षदा गरूड हिने स्नॅच प्रकारात ६९ किलो आणि क्लीन आणि जर्क प्रकारात ८८ किलो असे एकूण १५७ किलोग्रॅम बजन उचलून सुवर्णपदक पटकावले.


५४ वी आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धा 

current-affairs-54th-asia-championship-body-building-

मालदीवच्या माफुशी बेटावर
 सुरू असलेल्या ५४ व्या आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारतीय खेळाडू पनवेल- पळस्पे येथील महामार्ग पोलिस विभागाचे सहाय्यक 'पोलिस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी अभिमानास्पद कामगिरी करताना मास्टर्स शरीरसौष्ठवाच्या गटात “आशिया श्री'चा बहुमान पटकावून इतिहास रचला. 

नवी मुंबईच्या पोलीस दलात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून सेवेत असलेल्या सुभाष पुजारी यांनी आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचे पदक खोवले; पण यावेळी पदकाचा रंग सोनेरी होता. 
याआधी व्हिएतनाम येथे झालेल्या जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धत त्यांना कांस्यपदक मिळवले होते. पुजारींनी ऐतिहासिक कामगिरीनंतर आपले सुवर्ण महाराष्ट्र पोलीसदल, वरिष्ठ अधिकाऱ्यांना अर्पण केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या