👇👇 Chalu ghadamodi / Current affairs 4 july 2022 in Marathi
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचा ऐतिहासिक निर्णय
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने मोठी आणि ऐतिहासिक घोषणा केली असून पुरुष आणि महिला खेळाडूना समान वेतन जाहीर केले आहे.
न्यूझीलंड क्रिकेटने पाच वर्षाच्या कराराची घोषणा केली आहे. यामध्ये महिला क्रिकेटपटूंनाही आंतरराष्ट्रीय आणि उच्चस्तरीय देशांतर्गत सामन्यांसाठी पुरुष खेळाडू इतकेच मानधन मिळेल, असे बोर्डाने जाहीर केले आहे.
यासाठी मंडळाने एकदिवसीय, टी-२० आंतरराष्ट्रीय, फोर्ड ट्रॉफी आणि सुपर स्मॅश स्तरासह सर्व फॉरमॅट आणि स्पर्धांमध्ये पुरुषांच्या बरोबरीने मॅच फी मिळेल.
तसेच, करारानुसार देशांतर्गत करार मिळवणाऱ्या महिला खेळाडूंची संख्या ५४ वरून ७२ पर्यंत वाढली, तर पुरुष खेळाडूंना अधिक सामने खेळण्यासाठी आणि प्रशिक्षण आणि खेळण्यात अधिक वेळ घालवण्यासाठी जास्त राखून ठेवणारी रक्कम मिळेल.
📌 ९६ तास सलग स्केटिंग करून रूद्र नाईकची गिनीज बुकात नोंद
सांगलीतील संजयनगर येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील पब्लिक स्कूलमधील इयत्ता दुसरीमध्ये शिकत असलेल्या रुद्र हिरेन नाईक याने बेळगाव येथील शिवगंगा रोलर स्केटिंग अकॅडमीकडून आयोजित केलेल्या स्केटिंग
या खेळ प्रकारात सलग ९६ तास लार्जेस्ट रोलरस्केट करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉडमध्ये विश्व विक्रमाची नोंद केली.
📌 जगातील सर्वात वयोवृद्ध एअर होस्टेस म्हणून गिनीज बुकात नोंद
जेव्हा तुम्हाला एखादे काम आवडते तेव्हा ते करायला खूप मजा येते, मग नोकरीचे ओझे वाटत नाही. आपल्या कामावर अशाप्रकारे प्रेम केल्यामुळे एका महिलेने जागतिक विक्रम केला असून त्या सध्या खूप चर्चेत आहेत.
बेट्टे नष (Bette Nash) असे त्यांचे नाव आहे. त्या एअरहोस्टेस असून ८६ वर्षीय बेट्ठे नष यांनी जगातील सर्वात वयोवृद्ध एअर होस्टेसचा मान मिळवला असून त्यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले.
अमेरिकन एअरलाइन्सशी त्या दीर्घकाळापासून जोडलेली आहे. आतापर्यंत त्यांनी आपल्या आयुष्यातील ६५ वर्षे एअर होस्टेस म्हणून घालवली आहेत आणि याबरोबरच त्यांनी जागितक विक्रम केला आहे.
बेट्टे नष या मूळ मैच्युसेट्स येथील रहिवासी आहेत. तिने १९५७ मध्ये एअर होस्टेस म्हणून करिअरला सुरुवात केली.
0 टिप्पण्या