Free Online Chess Class ( Limited seats )

Free Online Chess Class ( Limited seats )

MPSC : कांदळवन सफारीसाठी ‘निसर्ग पर्यटन गाव’ ही संकल्पना : मारंबळपाडाची (विरार) निवड

 कांदळवन सफारीसाठी ‘ निसर्ग पर्यटन गाव ’ ही संकल्पना 

 मुंबई महानगर प्रदेशातील मारंबळपाडाची निवड 

 first-mangrove-ecotourism-village-at-marambalpada 

राज्यातील व्याघ्रप्रकल्पात येणाऱ्या पर्यटकांना निवासी सुविधा उपलब्ध व्हावी आणि जंगलालगतच्या गावकऱ्यांना पर्यटनातून (eco-tourism) आर्थिक मिळकत व्हावी, या दृष्टिकोनातून वन निवास (होम स्टे) ही संकल्पना विकसित करण्यात आली. आता त्याच धर्तीवर राज्यातील कांदळवन पर्यटनाला (mangrove eco-tourism) गती देण्यासाठी ‘निसर्ग पर्यटन गाव’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे.

mpsc-kandalvan-eco-tourism-marambalpada-virar-chalu-ghadamodi

  
राज्याच्या कांदळवन कक्षाने मुंबई महानगर प्रदेशातील मारंबळपाडा याची निवड त्यासाठी केली आहे. किनारपट्टी विनियमन क्षेत्रांतर्गत हे ठिकाण असल्यामुळे या परिसरातील कांदळवनांचे (mangrove forest or trees) कोणतेही नुकसान न करता तीन कंटेनरच्या माध्यमातून हे केंद्र बांधण्यात आले आहे. या केंद्राला योग्य असे कुंपण आणि सीसीटीव्ही कॅमेरा सुविधा आहेत.

निसर्ग पर्यटन गावासाठी दहा लाख रुपयांच्या बोटीची खरेदी केली असून ‘इंद्रायणी’ असे तिचे नामकरण केले आहे. या बोटीचे संचालन गावकऱ्यांमार्फत होईल. या बारा आसनी बोटीतून पर्यटकांना कांदळवनाची सुंदर झलक पाहता येईल. ही बोट कांदळवन संवर्धन आणि उपजीविका निर्माण योजनेअंतर्गत खरेदी करण्यात आली आहे. येथे भेट देणाऱ्यांसाठी कांदळवनात बोटीतून सफर, निसर्ग भटकंती, कांदळवन पक्षी निरीक्षण, बेटाला भेट असे अनेक उपक्रम विरार परिसरात उपलब्ध असतील.

येथे भेट देणाऱ्यांसाठी स्थानिक आणि त्यांची संस्कृती, कांदळवन आणि अनुषंगिक जैवविविधता याबाबतच्या माहितीचे आकर्षक पद्धतीने मांडलेले प्रदर्शन पाहायला मिळेल. या केंद्राच्या विकासामुळे मारंबळपाडा येथील इको-टुरिझमला चालना मिळण्याबरोबरच येथे भेट देणाऱ्यांच्या अनुभवात भर पडेल. तसेच स्थानिकांना अतिरिक्त उत्पन्नाची संधी निर्माण करण्यात हे केंद्र उपयोगी ठरेल. या केंद्रामुळे स्थानिकांचा कांदळवन संवर्धनातील सहभाग वाढण्यास प्रोत्साहन मिळेल.
– वीरेंद्र तिवारी, अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक (कांदळवन कक्ष)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या