बजरंग पुनियाने जागतिक कुस्ती स्पर्धेत जिंकले कांस्यपदक
Bajrang Punia becomes 1st Indian to win 4 medals at world wrestling championships
भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियाने बेलग्रेड येथे सुरू असलेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकून इतिहास रचला. जागतिक कुस्ती स्पर्धेत चार पदके जिंकणारा बजरंग हा एकमेव भारतीय कुस्तीपटू आहे. यापूर्वी बजरंगने २०१३ मध्ये कांस्य, २०१८ मध्ये रौप्य आणि २०१९ मध्ये पुन्हा कांस्यपदक जिंकले होते.जागतिक कुस्ती स्पर्धेच्या या मोसमात बजरंगने ६५ किलो वजनी गटात पोर्तो रिकोच्या सेबॅस्टियन रिवेराचा ११-९ असा पराभव केला. विशेष म्हणजे बजरंग आधीच्या लढतीत जखमी झाला होता, त्याच्या डोक्याला दुखापत झाली असतानाही तो स्पर्धेत खेळत राहिला.
बजरंग व्यतिरिक्त महिला कुस्तीपटू विनेश फोगट हिने चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकले आहे.
बजरंगने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक आणि २०२२ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते.
जागतिक कुस्ती स्पर्धेतील बजरंग पुनियाची कामगिरी
2013 : कांस्यपदक
2018 : रौप्यपदक
2019 : कांस्यपदक
2013 : कांस्यपदक
2018 : रौप्यपदक
2019 : कांस्यपदक
2022 : कांस्यपदक
0 टिप्पण्या