तैवानमध्ये भूकंपाचा तीव्र धक्का
Current affairs : Strong Earthquake in Taiwan
७.२ रिश्टर स्केलची तीव्रता • जपानमध्ये त्सुनामीचा इशारा
तैवानमध्ये रविवारी पुन्हा एकदा भूकंपाचे जोरदार धक्के बसले. येथे गेल्या चोवीस तासात शंभरहून अधिकवेळा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. या भूकंपामुळे अनेक ठिकाणी दरडी, पुल, घरे कोसळले आहेत. भूकंपामुळे अनेक घरे कोसळली असून त्याखाली नागरीक दबले असल्याचे सरकारमधील अधिकाऱ्यांनी सांगितले तर रेल्वे सेवाही विस्कळीत झाली असल्याचे ते म्हणाले, भूकंपानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला होता. लोकांनी घराबाहेर धाव घेतली. सुदैवाने या भूकंपात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
![]() |
strong-earthquake-taiwan |
Taiwan Earthquake तैवानमध्ये भूकंपाचे धक्के
या भूकंपाचा केंद्रबिंदू ताइतुंग काउंटीच्या उत्तरेला असल्याचे सांगण्यात आले आहे.
भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७. २ एवढी होती.
भूकंपामुळे दक्षिणेकडील काओशुंग शहरातील मेट्रो सेवा बराच काळ प्रभावित झाली होती. तैवान रेल्वे प्रशासनाकडून गाड्या तात्पुरत्या थांबण्यात आल्या आहेत. यासोबतच हायस्पीड रेल्वे सेवाही रद्द करण्यात आली आहे.
तैवानच्या किनारपट्टीवर ७ . २ रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसल्यानंतर जपानला सुनामीचा इशारा देण्यातआला आहे. येथे शनिवारीही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.४ एवढी होती.
परीक्षाभिमुख माहिती
- तैवानमध्ये : चोवीस तासात शंभरहून अधिकवेळा भूकंपाचे जोरदार धक्के
- भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७. २ एवढी
- या भूकंपाचा केंद्रबिंदू ताइतुंग काउंटीच्या उत्तरेला
0 टिप्पण्या