Free Online Chess Class ( Limited seats )

Free Online Chess Class ( Limited seats )

The US open 2022 men's singles winner Carlos Alcaraz


 युएस ओपन टेनिस स्पर्धा टीनएजर कार्लोस अल्कारेजने जिंकली 


The US open Tennis ( Aug 23 to Sept 12, 2022 )
 The US open 2022     men's singles winner     Carlos Alcaraz 

स्पेनच्या (Spanish player ) टीनएजर कार्लोस अल्कारेज याने वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी युएस ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकून पुरुष एकेरीचे अजिंक्यपद मिळविले आहे. त्याने अंतिम सामन्यात नॉर्वेच्या कॅम्पर रूडला ६-४, २-६, ७-६, आणि ६-३ असे पराभूत केले. रूड यंदा दुसऱ्यावेळी ग्रँड स्लॅम फायनलमध्ये पोहोचला होता मात्र दोन्ही वेळी त्याला अंतिम सामन्यात पराभवास सामोरे जावे लागले. तिसरे मानांकन मिळालेल्या अल्कारेजने हा सामना ३ तास २० मिनिटात जिंकला आणि अवघ्या १९ व्या वर्षी पुरुष सिंगल्स जिंकणारा तो पहिला खेळाडू ठरला.

spanish-tennis-player-carlos-alcaraz-garfia
carlos alcaraz spanish tennis player


४९ वर्षांपूर्वी मानांकन म्हणजे एटीपी रैंकिंगची सुरवात झाली. त्यानंतर प्रथमच अल्कारेज पहिले मानांकन मिळालेला पहिला टीनएजर खेळाडू ठरला आहे. अर्थात २३ वर्षीय रूडने हा सामना जिंकला असता तर तो सुद्धा पहिले मानांकन मिळविणारा पहिला युवा खेळाडू ठरला असता पण त्याला ही संधी मिळाली नाही.

कार्लोसचे हे पहिलेच ग्रँडस्लॅम टायटल आहे. तो प्रथमच अंतिम फेरीत पोहोचला होता. गेल्या ३२ वर्षातील युएस ओपन मधील तो सर्वात तरुण चँपियन बनला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या