UK govt announces 3000 work visas for young Indian professionals

ब्रिटन दरवर्षी तीन हजार भारतीयांना व्हिसा देणार मोदी भेटीनंतर सुनक यांची घोषणा

G20 Summit 2022
G20 Summit 2022


ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी भारतातील युवकांना दरवर्षी ब्रिटनमध्ये काम करणे आणि निवासासाठी तीन हजार व्हिसा देण्याच्या योजनेला हिरवा कंदील दाखविला आहे. ब्रिटीश सरकारने ही घोषणा केली असून या योजनेचा लाभ मिळालेला भारत पहिला देश बनला आहे. विशेष म्हणजे जी- २० परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट झाल्यावर काही तासात ही घोषणा करण्यात आली.

 G20 Summit 2022 

ब्रिटीश पंतप्रधान कार्यालयाकडून करण्यात आलेल्या घोषणेनुसार, युके, भारतातील युवक प्रोफेशनलसाठी सादर झालेल्या योजनेला मान्यता देत आहे. १८ ते ३० वयोगटातील शिक्षित भारतीय नागरिकांसाठी दरवर्षी तीन हजार व्हिसा दिले जाणार असून त्यात दोन वर्षे कामाची परवानगी दिली गेली आहे. जी-२० शिखर परिषदेत, गेल्या महिन्यात ब्रिटनचे पंतप्रधान बनलेले ऋषी सुनक आणि भारताचे पंतप्रधान मोदी यांची पहिलीच भेट होती.
भारताबरोबर द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याचा दिशेने टाकलेले महत्वाचे पाऊल आहे. 

 नक्की वाचा :