Daily Current affairs for mpsc 11 july 2022
विम्बल्डन टेनिस स्पर्धा : लंडन (इंग्लंड)
विम्बल्डनवर नोवॅक जोकोविकचे अधिपत्य कायम
ऑस्ट्रेलियाचा निक किरियॉस उपविजेता
- सर्बियाच्या नोवॅक जोकोविकने हिरवळीवरील राजा म्हणून आपल्या का संबोधले जाते, याचा प्रत्यय पुन्हा एकदा दाखवून दिला. ऑस्ट्रेलियाच्या तापट आणि रागीट स्वभावाचा निक किरियॉसने विजयासाठी त्याला अंतिम फेरीत चांगलेच झुंजवले. मात्र चौथा सेट टायब्रेकमध्ये जिंकत जोकोविकने विम्बल्डनचा किताब पटकावला.
- पहिल्यांदा ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळणाऱ्या निक किरियॉसला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले.
wimbledon champion 2022 - विशेष म्हणजे पहिला सेट गमावूनही शानदार खेळाचा नजराणा सादर करत जोकोविकने कारकोर्दीतील २१ व्या आणि विम्बल्डनमधील एकूण सातव्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. फेडररच्या नावावर विम्बल्डनची सर्वाधिक ८ विजेतेपदं जमा आहेत. त्यानंतर आता जोकोविकने ७ विजेतेपदं जमा केली.
- किरियॉसने पहिला सेट ६-४ असा जिंकत आघाडी घेत जोकोबिकला धक्का दिला. सलामीचा सेट गमावल्यानंतर सावरत जोकोविकने दुसऱ्या सेटमध्ये आपल्या खेळाचा दर्जा दाखवून दिला. त्याने दुसऱ्या सेटचा निकाल ६-३ असा आपल्या बाजूने लावत सामना बरोबरीत आणला. तिसऱ्या सेटमध्येही जोकोविकने ६-४ असा दबदबा राखला. चौथ्या सेटमध्ये दोघांत चांगलाच सामना रंगला आणि सामन्याचा निकाल टायब्रेकमध्ये ७-६ (७/३) असा जोकोविकच्या बाजूने लागला.
Mpsc Chalu ghadamodi 11 july 2022
- ऑस्ट्रेलिया खुली स्पर्धा : २००८, २०११, २०१२, २०१३, २०१५, २०१६, २०१९, २०२०, २०२१
- फ्रेंच खुली स्पर्धा : २०१६, २०२१
- विम्बल्डन स्पर्धा : २०११, २०१४, २०१५, २०१८, २०१९, २०२१, २०२२
- अमेरिका खुली स्पर्धा : २०११, २०१५, २०१८
- जोकोविकने या बळावरआपल्या कारकीर्दीतल्या ग्रँडस्लॅम जेतेपदांची संख्या २१ पर्यंत वाढवली. विम्बल्डनच्या सलग चार विजेतेपदांचा यामध्ये समावेश आहे. २०२० मध्ये कोरोना संसर्गामुळे स्पर्धा रह करण्यात आली होती.
- स्पेनच्या राफेल नदालच्या नावावर सर्वाधिक २२ ग्रँडस्लॅम जेतेपद आहेत. त्यानंतर आता जोकोविक २१ ग्रँडस्लॅमसह दुसरा क्रमांक लागतो. स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर या पंक्तीत २० ग्रँडस्लॅमसह तिसऱ्या क्रमांकावर उभा आहे.
- फेडररच्या नावावर विम्बल्डनची सर्वाधिक ८ विजेतेपदं जमा आहेत. त्यानंतर जोकोविक (७) उभा आहे.
0 टिप्पण्या