👇👇 Chalu ghadamodi-Current affairs 10 july 2022 in Marathi
विम्बल्डनची राणी रायबाकिना
विम्बल्डन टेनिस स्पर्धा ॥ जाबेऊरचे उपविजेतेदावर समाधान
कझाकस्तानची एलिना रायबाकिना विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीतील विजेती ठरली आहे.
अंतिम फेरीत रायबाकिनाने ट्यूनिशियाची ओन्स जाबेऊर विरोधात पहिला सेट गमावला. मात्र, त्यानंतर पुढील दोन सेट जबरदस्त इच्छाशक्तीच्या बळावर जिंकत विजेतेपदावर मोहोर उमटवली.
१९६२ नंतर पहिल्यांदा विम्बल्डन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पदार्पण करणाऱ्या खेळाडू या सामन्याच्या निमित्ताने आमने-सामने आल्या होत्या. त्यामुळे अंतिम फेरीचा सामना चुरशीचा होणार, अशी चिन्हे दिसत होती. त्यानुसारच दोघींमध्ये खेळ रंगला.
जाबेऊरने पहिला सेट ३-६ असा जिंकत आघाडी घेतली. मात्र, रायबाकिनाने पुनरागमनाच्या बळावर दुसरा सेट ६-२ असा खिशात घालत सामना बरोबरीत आणला. तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये रायबाकिनाने सर्वस्व झोकून देत ६-२ अशी बाजी मारत पहिल्या-वहिल्या ग्रँडस्लॅम जेतेपदावर मोहोर उमटवली.
विलियम्सनंतरची दुसरी खेळाडू जागतिक क्रमवारीत 3१ व्या स्थानावर असताना अमेरिकेच्या व्हिनस विलियम्सने २००७ मध्ये विम्बल्डनचे जेतेपद पटकावले होते. त्यानंतर अशी कामगिरी करणारी रायबाकिना (क्रमवारी २३) दुसरी महिला टेनिसपटू ठरली आहे.
कझाकस्तानची पहिली टेनिसपटू.
ग्रँडस्लॅम स्पर्धेचा किताब पटकवणारी रायबाकिना कझाकस्तानची पहिली (पुरुष/महिला) टेनिसपटू ठरली आहे. मॉस्कोत जन्मलेली रायबाकिना २०१८ नंतर कझाकस्तानचे प्रतिनिधित्व करत आहे.
0 टिप्पण्या