दुबईमध्ये आता चंद्रसफारीचा आनंद घेता येणार
First Moon resort in DUBAI soon
दुबई आज लाखो पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे; कारण येथे अनेक अद्भूत आकर्षक स्थळे पर्यटकांना आकर्षून घेण्यास सज्ज आहेत. जगातील सर्वात महागडे आणि ८२९.८ मीटर उंचीचे हॉटेल बुर्ज अल अरब येथे आहे तसेच जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा येथेच आहे. आता या आकर्षण यादीत आणखी एका वास्तूची भर पडणार आहे.![]() |
first moon resort |
जगातील पहिले मून रिसोर्ट, दुबई येथे उभारले जात आहे. कॅनडाची आर्किटेक्चरल फर्म मून वर्ड रिसोर्टने या इमारतीची जबाबदारी घेतल्याचे सांगितले जात आहे. या रिसोर्ट मुळे पाहुण्यांना जमिनीवरच किफायती दारात अंतरीक्ष पर्यटनाचा फील मिळणारआहे. पृथ्वी न सोडताही चंद्रावर गेल्याचा आनंद येथे मिळणार आहे.
हे रिसोर्ट चंद्राच्या आकाराचे असेल अन त्याचा पृष्ठभाग सुद्धा चंद्राप्रमाणे असेल. हे हॉटेल ४८ महिन्यात बांधून पूर्ण होणार आहे. या रिसोर्टची एकूण उंची ७३५ फुट असून ते बांधण्यासाठी ४.२ अब्ज पौंड म्हणजे ३८ हजार कोटी रुपये खर्च येणार आहे.
येथे येणाऱ्या पर्यटकांना स्पा, नाईटक्लब, इव्हेंट सेंटर, ग्लोबल मीटिंग प्लेस, लाउंज, इन हाउस मून शटल सुविधा मिळेल त्याचबरोबर विभिन्न अंतराळ संस्था आणि त्यांच्याशी संबंधित अंतराळ प्रवास प्रशिक्षण प्लॅटफॉर्म मिळेल.
मनोरंजन, आकर्षण, शिक्षण, पर्यावरण व स्पेस टुरिझम अशा अनेक सुविधा यामुळे उपलब्ध उपलब्ध होणार आहेत. यामुळे दुबईच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असा दावा केला जात आहे.

0 टिप्पण्या