Free Online Chess Class ( Limited seats )

Free Online Chess Class ( Limited seats )

चालू घडामोडी Chalu ghadamodi-Current affairs 18 july 2022 in Marathi

 चालू घडामोडी Chalu ghadamodi-Current affairs 18 july 2022 in Marathi 


 सिंगापूर खुली स्पर्धा २०२२ 

भारताची स्टारमहिला बॅडमिंटनपटू पुसरला व्यंकट सिंधू म्हणजेच पी. व्ही.सिंधूने सिंगापूर खुल्या सुपर ५०० स्पर्धेच्या विजेतेपदाला गवसणी घातली. अटीतटीच्या झालेल्या अंतिम फेरीतील लढतीत सिंधूने चीनची वँग झी यी या खेळाडूचा प्रतिकार तीन गेममधील सामन्यात मोडित काढला. 
पहिला गेम : २१ - ०९
दुसरा गेम : ११ - २१
तिसरा गेम : २१ - १५ 
sports-current-affairs-p-v-sindhu-singapour-open-2022

सिंधूने या विजयाच्या बळावर यंदाच्या हंगामातील तिसऱ्या स्पर्धेचा चषक आपल्या झोळीत टाकला.
  • सिंगापूर खुली स्पर्धा २०२२ : परीक्षाभिमुख  
  • विजेता : पी. व्ही.सिंधू
  • उपविजेता : वँग झी यी (चीनची)

 आयएसएसएफ नेमबाजी विश्‍वचषक स्पर्धा  

आयएसएसएफ (ISSF) नेमबाजी भारताच्या अंजुम मोदगिलने आयएसएसएफ नेमबाजी विश्‍वचषक स्पर्धेतील ५० मीटररायफल थ्री पोझिशन्समध्ये कांस्यपदक मिळवले. अंतिम फेरीत ४०२.९ गुणांची कमाई करत अंजुम तिसऱया स्थानावर राहिली. निलिंगमध्ये १००.७, प्रोनमध्ये १०१.६ आणि स्टँडिंग पोझिशनमध्ये २२०.६ अशी गुणांची कमाई अंजुमने केली.
mpsc-sports-current-affairs-issf-july-2022-in-marathi

जर्मनीची अना जेनसर (४०७.७) आणि इटलीची बार्बर गॅमबारो (४०३.४) अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदकाच्या मानकरी ठरल्या.

 इंडिगो कंपनीच्या विमानाचे कराची विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग 

संयुक्‍त अरब अमिरात मधील (यूएई) शारजाह येथून हैदराबादला येणार्‍या इंडिगो कंपनीच्या विमानाचे रविवारी पाकमधील कराची विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. विमानात अचानक तांत्रिक बिघाड उद्‌भवल्याने वैमानिकाने समयसूचकता दाखवत कराचीत लँडिंगचा निर्णय घेतला. त्यामुळे सुदैवाने मोठा अनर्थ घडला नाही.
mpsc-current-affairs-IndiGo-6E-1406-emergency-landing-2022

गेल्या दोन आठवड्यांत भारतीय एअरलाईन्सची कराचीत झालेली ही दुसरी एमर्जन्सी लँडिंग आहे. स्पाईसजेटचे एक विमान कराचीत उतरवण्यात आले होते.

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) दिलेल्या माहितीनुसार, यूएईतील तिसरे सर्वात मोठे शहर शारजाह येथून निघालेल्या इंडिगो कंपनीच्या IndiGo 6E 1406 या विमानाने भल्या पहाटे १२ वाजून ४१ मिनिटांनी उड्डाण भरले. २ वाजून ५० मिनिटांनी हे विमान हैदराबादेत दाखल होणार होते; मात्र २० मिनिटे आगोदर त्यात अचानक तांत्रिक बिघाड उद्‌भवला. त्यामुळे दुर्घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायोजना करत जवळ असलेल्या कराचीत विमानलँड करण्याचा निर्णय वैमानिकाने घेतला.

गेल्या महिनाभरात इंडिगो व स्पाईसजेटच्या विमानात बिघाड व इमर्जन्सी लँडिंगच्या सुमारे १० घटना घडल्या. गेल्या १४ जुलैला इंडिगोच्या दिल्ली-वडोदरा 6E 859 या विमानाचे इंजिन बिघडले असता त्याला जयपूरकडे वळवले होते, तसेच इंडिगोच्या ६E 2615 या दिल्ली ते मणिपूर विमानाला खराब हवामानामुळे कोलकात्यात उतरवण्यात आले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या