Free Online Chess Class ( Limited seats )

Free Online Chess Class ( Limited seats )

Daily Current Affairs Oct 2022 / World's tallest Shiva statue

 

 Daily Current Affairs Oct 2022 in marathi

 World's tallest Shiva statue in India; 369 feet 

राजस्थानच्या राजसमंद जिल्ह्यातील नाथद्वारा परिसरात ३६९ फूट उंचीच्या 'विश्वास स्वरूपम' (Viswas Swaroopam) नामक भगवान शिवशंकराच्या भव्य पुतळ्याचे शनिवारी 29 oct 2022 लोकार्पण झाले आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, कथावाचक मुरारी बापू, योगगुरू बाबा रामदेव, विधानसभा अध्यक्ष डॉ. सी. पी. जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुतळ्याचे उद्घाटन झाले. 

 Daily Chalu Ghadamodi Oct 2022 in marathi 

डोंगर परिसरात साकारलेली निरागस व ध्यान मुद्रेतील ही जगातील सर्वात उंच शिवमूर्ती आहे. तत पदम संस्थानच्या वतीने ही भव्य मूर्ती साकारण्यात आली आहे.

 lord Shiva statue : statue of belief 

नाथद्वारा येथील गणेश टेकडीवरील ५१ बिघा (जवळपास ३२ एकर) जमिनीने व्यापलेल्या डोंगरावर ही शंकराची ध्यान मुद्रेतील ही मूर्ती साकारण्यात आ
ली.




 शिव मूर्तीची वैशिष्ट्ये  

  • भक्ती अन् पर्यटनाचा संगम मूर्ती घडवण्यासाठी ३ हजार टन स्टील व लोखंड, २.५ लाख क्यूबिक टन काँक्रीट व वाळूचा वापर करण्यात आला. 
  • ताशी २५० किमी वेगाच्या वाऱ्यातही ही मूर्ती अढळ राहील. शिवाय पुढील २५० वर्ष टिकू शकेल, असे या मूर्तीचे मजबूत बांधकाम आहे. 
 Daily Current Affairs Oct 2022 in marathi for mpsc 
  • भाविकांना मूर्तीच्या आतून सर्वात वरच्या टोकाला जाण्यासाठी चार लिफ्ट, तीन वेगवेगळ्या ठिकाणी पायऱ्या व सभागृह बांधलेले आहे. 
  • मूर्तीच्या भोवतालच्या परिसरात पर्यटकांच्या मनोरंजनासाठी अडव्हेंचर्स पार्क, उद्याने, बंजी जम्पिंग, गोकार्ट, फूड कोर्टसह विविध दालनांनी सुसज्ज ठेवण्यात येणार आहे. 
  • आकर्षक विद्युत रोषणाईमुळे रात्रीच्या वेळी मूर्तीचे सौंदर्य आणखीनच खुलून दिसणार आहे.


 जगातील 5 सर्वात ऊंच शिव मूर्ती ...

  • विश्वास स्वरूपम, राजस्थान- 369 फीट
  • कैलाशनाथ महादेव मंदिर, नेपाल- 143 मीटर
  • मरूद्वेश्वर मंदिर, कर्नाटक- 123 मीटर
  • आदियोग मंदिर, तमिलनाडु- 112 मीटर
  • मंगल महादेव, मारीशस- 108 मीटर

 Daily Chalu ghadamodi Oct 2022 for mpsc 

 हे ही वाचा : 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या