Free Online Chess Class ( Limited seats )

Free Online Chess Class ( Limited seats )

Daily Current Affairs 24 Oct 2022 in marathi


 Daily Current Affairs 24 Oct 2022 in marathi 


 ऋषी सुनक ब्रिटनचे नवे पंतप्रधान 

२८ ऑक्टोबरला शपथविधी होणार 

ब्रिटनचे राजकारण लिझ ट्रस यांच्या राजीनाम्यानंतर भारतीय वंशाचे नेते ऋषी सुनक ब्रिटनचे नवे पंतप्रधान झाले आहेत. माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पुन्हा पंतप्रधान होण्यासंदर्भातील शक्यतांचा अंदाज घेत रिंगणातून माघार घेतली होती. ऋषी सुनक यांच्या समोर पेनी मॉडेंट यांचेही आव्हान होते. मात्र, पेनी मॉईंट यांनी माघार घेतल्याने ऋषी सुनक नवे पंतप्रधान झाले आहेत. 

 Daily Chalu Ghadamodi 2022 


ऋषी सुनक आता ब्रिटनचे पहिले भारतीय वंशाचे पंतप्रधान असणार आहेत. इन्फोसीसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे ते जावई आहेत. सुनक यांनी यापूर्वी अर्थमंत्री म्हणून देखील काम केले आहे.


Daily Chalu Ghadamodi Oct 2022 in marathi
google : Mr. Rushi Sunak


संपूर्ण जगभरात भारतीय वंशाचे लोक दिवाळीचा आनंद साजरा करत असताना आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. पेनी मॉईंट यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतल्याने ऋषी सुनक यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. 





मागील काही महिन्यांपूर्वी ऋषी सुनक आणि लिझ ट्रस यांच्यात जॉन्सन यांच्या राजीनाम्यानंतर लढत झाली होती. मात्र, आर्थिक आघाडीवर अपयश आल्यानंतर लिझ ट्रस यांनी राजीनामा दिला. ट्रस यांच्या राजीनाम्यानंतर आता ऋषी सुनक यांची पंतप्रधान म्हणून घोषणा करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा : 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या