Free Online Chess Class ( Limited seats )

Free Online Chess Class ( Limited seats )

Daily current affairs 21 Oct 2022

 Daily current affairs 21 Oct 2022 


 अग्नी प्राईमची चाचणी यशस्वी 

भारताने शुक्रवारी ओडिशाच्या किनारपट्टीवर स्वदेशी बनावटीच्या मध्यम पल्ल्याचे 'बॅलिस्टिक' क्षेपणास्त्र 'अग्नी प्राईम' ची यशस्वी चाचणी घेतली. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) सूत्रांनी ही माहिती दिली. ए.पी.जे. अब्दुल कलाम बेटावरून सकाळी 09.45 हे क्षेपणास्त्र प्रक्षेपित करण्यात आले. सूत्रांनी सांगितले, की घनइंधन असलेल्या या क्षेपणास्त्राने चाचणीदरम्यान सर्व निर्धारित मापदंड यशस्वीरीत्या पूर्ण केले. 

agni prime missile



अधिकाऱ्यांनी सांगितले, की क्षेपणास्त्राच्या प्रवासादरम्यान 'रडार' द्वारे सातत्याने निरीक्षण केले गेले. तसेच यासाठी विविध ठिकाणी दूरमापक उपकरणे बसवली होती. हे क्षेपणास्त्र 1000 to 2000 किलोमीटरपर्यंतच्या लक्ष्यावर मारा करू शकते. सूत्रांनी सांगितले, की या क्षेपणास्त्राची मागील चाचणी १८ डिसेंबर रोजी कलाम बेटावरूनच करण्यात आली होती. त्या वेळीही ती यशस्वी झाली होती.



 अवघे २६ वयोमान असलेल्या रोमिना पोरमोख्तारी या स्वीडन मिनिस्टर 


वातावरण बदलासंदर्भात लढा देणारी किशोरवयीन पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गच्या देशाने एक कौतुकास्पद निर्णय घेतलाय. स्वीडनच्या नवीन सरकारने मंगळवारी अवघ्या २६ वर्षांच्या तरुणीला क्लायमेट खात्याची मंत्री म्हणून घोषित केलंय. रोमिना पौर्मोख्तरी असं या तरुण महिला मंत्र्याचं नाव आहे. स्वीडनच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात तरुण असलेल्या वातावरण बदल (क्लायमेट) खात्याच्या मंत्री आहेत. त्या स्वीडनमधील वयाने सर्वात लहान असलेल्या केंद्रीय मंत्री आहेत. 


Youngest Minister : Romina Pormokhtari



मात्र स्वीडन सरकारच्या या निर्णयावर विरोधकांकडून जोरदार टीका होत असून हा निर्णय देशाचे नुकसान करणारा आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र विरोधकांच्या टीकेनंतरही पंतप्रधान उल्फ क्रिस्टरसन यांनी रोमिना यांची हवामान खात्याच्या मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे.

 कोण आहेत रोमिना पोरमोख्तारी ? 

  • स्वीडनची राजधानी स्टॉकहोमच्या उपनगरात इराणी वंशाच्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला.
  • त्या लिबरल पक्षाच्या युवा शाखेच्या प्रमुख नेत्या होत्या.
  • त्या यापूर्वी पंतप्रधान क्रिस्टरसन यांच्या टीकाकार म्हणून ओळखल्या जात.

 रोमिना यांच्यावर विरोधकांची टीका का ? 

  • लिबरल पक्षाच्या नेत्या असलेल्या रोमिना पोरमोख्तारी यांनी त्यांच्या राजकीय जीवनात पर्यावरणाशी संबंधित कोणतेही काम केलेले नाही किंवा पर्यावरणीय चळवळीशीही त्यांचा काहीही संबंध नाही.
  • सत्तेवर येताच नव्या सरकारने पर्यावरण मंत्रालय रद्द करून हवामान या नव्या खात्याची निर्मिती केली. त्याला पर्यावरणवाद्यांसह सोशल डेमोक्रॅट पक्षाचा विरोध आहे. विशेष म्हणजे रोमिना यांच्या लिबरल पक्षानेही याला पाठिंबा दिल्याने रोमिना यांच्यावर विरोधकांनी टीका केली आहे.

 इम्रान खान पाच वर्षांसाठी पाकिस्तानच्या 'पार्लमेंट'च्या सदस्यासाठी अपात्र 


पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने देशाच्या माजी पंतप्रधान इम्रान खान यांना भांडारातील (तोशाखाना) भेटवस्तू विक्रीतून मिळालेले उत्पन्न दडवल्याप्रकरणी पाच वर्षांसाठी अपात्र ठरवले. या काळात इम्रान खान यांना कोणत्याही सार्वजनिक पदाची जबाबदारी घेता येणार नाही.

खान यांच्यावर विदेशी नेत्यांकडून मिळालेल्या भेटवस्तूंच्या विक्रीतून मिळालेली रक्कम उघड न केल्याचा आरोप होता. यामुळे पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे (PTI ) प्रमुख असलेले ७० वर्षीय इम्रान खान पाच वर्षांसाठी पाकिस्तानच्या 'पार्लमेंट'चे सदस्य होऊ शकत नाहीत. ऑगस्टमध्ये सत्ताधारी आघाडी सरकारच्या खासदारांनी खान यांच्याविरोधात पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाकडे (ईसीपी) या प्रकरणी तक्रार दाखल केली होती.

PAK former PM Imran Khan


'तोशाखाना' मधून सवलतीच्या दरात खरेदी केलेल्या भेटवस्तू वाढीव किमतीला विकून त्याद्वारे आलेले उत्पन्न दडवल्याबद्दल खान यांना अपात्र ठरवण्याची मागणी या तक्रारीत करण्यात आली. या प्रकरणाच्या सुनावणीनंतर आयोगाने १९ सप्टेंबर रोजी आपला निर्णय राखून ठेवला होता. 

मुख्य निवडणूक आयुक्त सिकंदर सुलतान राजा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने इस्लामाबादमधील आयोगाच्या सचिवालयात खान यांच्याविरुद्ध हा निकाल दिला. खंडपीठाच्या सर्व पाच सदस्यांनी शुक्रवारी एकमताने खान हे भ्रष्ट व्यवहारात दोषी ठरवत त्यांना पाच वर्षांसाठी अपात्र ठरवले. खान यांच्यावर भ्रष्ट व्यवहार कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल, असेही आयोगाने म्हटले आहे. 

या निर्णयाला इस्लामाबाद न्यायालयात आव्हान दिले जाईल, असे खान यांचा पक्ष 'पीटीआय'चे सरचिटणीस असद उमर यांनी सांगितले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या