Free Online Chess Class ( Limited seats )

Free Online Chess Class ( Limited seats )

चालू घडामोडी Chalu ghadamodi-Current affairs 20 july 2022 in Marathi

 👇👇 Chalu ghadamodi-Current affairs 20 july 2022 in Marathi 

mpsc-chalu-ghdamodi-july-2022

 विश्‍वचषक नेमबाजी स्पर्धेत नेमबाज मैराज खानला 
सुवर्णपदक 
 

सुवर्णपदक भारताचा अनुभवी नेमबाज मैराज खानने आयएसएसएफ विश्‍वचषक नेमबाजी स्पर्धेत पुरूषांच्या स्कीटप्रकारात पहिले सुवर्णपदक मिळवले आहे. ही स्पर्धा चांगवान येथे पार पडत आहे. ४0 फैऱ्यांच्या अंतिम फेरीत ४६ वर्षीय उत्तर प्रदेशच्या मैराजने ३७ गुणांसह अग्रस्थान पटकावले आहे.

mpsc-current-affairs-july-2022-mairaj-khan-in-marathi

  • दोन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवलेला मैराज खान सध्या सुरू असलेल्या विश्‍वचषकात भारताचा सर्वात वरिष्ठ खेळाडू आहे. 
  • मैराजने जिओ येथे २०१६ मध्ये झालेल्या विश्‍वचषक स्पर्धेत रौप्यपदक मिळवले होते. 
  • त्तर प्रदेशात जन्म झालेला मैराज खान हा भारताचा अनुभवी नेमबाज आहे. 
  • मैराजने आतापर्यंत दोन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेले आहे. तसेच जागतिक नेमबाजी स्पर्धांमध्ये भारताला अनेक पदके मिळवून दिली 
अंजुम मुदगिल, आशी चौक्सी आणि सिप्ट कौर सामरा या भारतीय त्रिकुटाने महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन्स सांघिक गटात कांस्यपदक पटकावले.

amazon-prime-day

अनिश भानवाला आणि रिघम सांगवान : सांघिक स्पर्धेत कांस्यपदक 

  • दोघांनी आयएसएसएफ नेमबाजी विश्‍वचषक स्पर्धेच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. या भारतीय जोडीने कांस्यपदकाच्या प्ले-ऑफ सामन्यात झेकच्या अँना डेडोबा आणि मार्टीन पोद्रास्की जोडीचा १६-१२ असा पराभव केला आहे. 
  • आयएसएसएफ नेमबाजी विश्‍वचषकातील जोडी म्हणून अनिश आणि रिधमचे दुसरे पदक आहे.

 आशियाई क्रीडा स्पर्धेच्या वेळापत्रकात बदल  

  • चीनच्या हांगझो येथे १० ते २५ सप्टेंबर या कालावधीत होणारी १९ वी आशियाई क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे. 
  • चीन ऑलिम्पिक समिती आणि हांगझो आशियाई क्रीडा स्पर्धा संयोजन समिती यांच्याशी चर्चा करून आशियाई ऑलिम्पिक परिषदेने आशियाई क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
mpsc-current-affairs-19-asian-games-july-2022-in-marathi

  • आशियाई ऑलिम्पिक परिषदेने जाहीर केलेल्या नव्या तारखांनुसार, पुढच्या वर्षी २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोंबर २०२३ ही स्पर्धा पार पडेल. 
  • महत्वाचं म्हणजे, ही स्पर्धा पुढे का ढकलली ? यामागचं कारण अद्याप समोर आलं नाही. परंतु, चीनमधील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलाय, असं म्हटलं जाते.

 दक्षिण आफ्रिकेत होणार मिनी आयपीएल  

आयपीएल २०२३ आधी मिनी आयपीएल खेळवली जाणार आहे. ही स्पर्धा भारतात नाही तर दक्षिणआफ्रिकेत होणार आहे. आयपीएलप्रमाणेच दक्षिण आफ्रिकेनेही टी-२० लीग लॉन्च केली आहे.
 
current-affairs-mini-ipl-south-africa-july-2022-in-marathi

या स्पर्धेला मिनी आयपीएल म्हटले जात आहे; कारण या लीगमध्ये खेळणाऱ्या ६ टीमना आयपीएल फ्रॅन्चायजींच्या मालकांनीच विकत घेतले आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्स, सनरायजर्स हैदराबाद, लखनऊ सुपर जाएंठस आणि राजस्थान रॉयल्स यांनी दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० लीगमध्ये मालकी हक्क मिळवला आहे.

amazon-prime-offer-upto-70%-off-books-toys
 
या स्पर्धेचे आयोजन पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात होणार आहे. क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार आयपीएलच्या वेगवेगळ्या फ्रन्चायजीनी पुढच्या वर्षांच्या सुरूवातीला होणाऱ्या क्रिकेट साऊथ आफ्रिकेच्या टी-२० लीगमध्ये ६पाला टीम विकत घेतल्या आहेत.

आयपीएलची सगळ्यात यशस्वी टीम मुंबई इंडियन्सला 'केपटाऊन', चेन्नई सुपर किंग्सला 'जोहान्सबर्ग' आणि दिल्ली कॅपिटल्सला 'सेंच्यु्यिन' या शहरांची नावे दिली जातील. तर आयपीएल २०२२ मध्ये पदार्पण करणारी लखनऊ 'डरबन' फ्रॅन्चायजीसाठी आग्रही आहे. तर सनरायजर्स हैदराबादला 'पोर्ट एलिझाबेथ' टीममध्ये रस आहे. 

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्सनी टीम विकत घेण्यासाठी जवळपास २५० कोटी रुपयांची बोली लावली.
आयपीएल मॉडेलनुसार प्रत्येक टीमला १० वर्षांसाठी फ्रॅन्चायजी फीच्या १० टक्के द्यावे लागणार आहेत.

 ब्रिटनमध्ये ऐतिहासिक तापमानाचा विक्रम 

ब्रिटनमध्ये मंगळवारी तापमानाचे सर्व विक्रम मोडीत निघाले. लंडनच्या हिथ्रो विमानतळावर दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास ४०.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून देशातील हे आजपर्यचे सर्वाधिक तापमान आहे. हा पारा लवकरच ४१.९ अंशाच्याही पुढे जाऊ शकतो, असा इशाराही हवामान खात्याच्या अधिकारी रॅशेल आयर्स त्यांनी दिला. 

युरोपात उष्णतेची लाट आली असून ब्रिटन, फ्रान्स पोर्तुगालसह इतर देशांमध्ये उच्चांकी तापमानाची नोंद होत आहे. गत आठवड्यात पोर्तुगालचा पारा तर ४८ अंशापर्यंत पोहोचला होता.
 
current-affairs-july-2022-uk-highest-temptreture-in-marathi

यापूर्वी पूर्व इंग्लंडमधील केंब्रिज बोटॅनिक गार्डनमध्ये २०१९ साली ३८.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. हा ब्रिटनमधील तापमानाचा कालपर्यंतचा उच्चांक होता; परंतु मंगळवारी तापमानाने चाळिशी ओलांडली आणि ब्रिटनमध्ये विक्रमी तापमानाची नोंद झाली.

top branded mobile on amazon prime day offer

उष्णतेमुळे रस्त्यावरील डांबर वितळत आहे. त्यामुळे अनेक रस्ते बंद करण्यात आल्याने त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला आहे. याशिवाय काही रेल्वे, मेट्रो रद्द करण्यात आल्याने स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. ब्रिटनची रेल्वे वाहतूक यंत्रणा एवढ्या तापमानात काम करण्यासाठी सक्षम नसल्याचे ब्रिटनच्या परिवहनमंत्र्यांनी सांगितले. शाळादेखील बंद करण्यात आल्या आहेत.  रुग्णालयांनी अत्यावश्यक शस्त्रक्रिया वगळता उर्वरित सर्व शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या आहेत. 

अनेक कंपन्यांनी कार्यालये बंद ठेवून लोकांना वर्क फ्रॉम होम करण्यास सांगितले आहे. ब्रिटनमध्ये पंख्यांच्या मागणीत ५० पट वाढ झाली आहे. याशिवाय बाटलीबंद पाणी, शीतपेये यांचाही खप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. 

अतिउष्णतेमुळे ग्रीस, फ्रान्स,पोर्तुगाल, स्पेनमधील अनेक वनक्षेत्रांमध्ये वणवे पेटले आहेत. त्यामुळे उष्णतेत अधिकच भर पडत आहे. 
हवामान बदलाचे दुष्परिणाम असल्याचे पर्यावरणतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

 डॉली सैनीची सुवर्णपदकावर मोहोर 

माफुशी (मालदीव) येथे भारताने ५४ व्या आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेतल ५५ किलो वजनी गटात डॉली सैनीने सुवर्णपदकाची कमाई केली.
 
current-affairs-dolly-saini-bodybuilder-july-2022

वरिष्ठ महिला गटातील १५५ सेमी उंचीच्या मॉडेल फिजीक प्रकारात भाविका प्रधानने कांस्य मिळवले. मुंबईकर असलेल्या डॉक्टर मंजिरी भावसारने मॉडेल फिजीक प्रकारात संघर्षमय लढतीत कांस्यपदक मिळवले. 

तर कनिष्ठ महिला गटातील मॉडेल फिजीक प्रकारात सोलिमला जाजो हीने रौप्य पदकाला गवसणी घातली.

थायलंड, मंगोलिया आणि व्हिएतनामच्या महिला खेळाडूंच्या शरीरसौष्ठवापुढे भारतीय खेळाडूंचा निभाव लागणे शक्‍य नव्हते. मात्र, तरीही भारताच्या महिलांनी जोरदार प्रयल केले आणि यामध्ये डॉली सैनीचे नाव पहिले घ्यावे लागेल. थायलंड आणि व्हिएतनामच्या खेळाडूंना मागे टाकत मंगळवारी दिवसातील एकमेव सुवर्ण तिने पटकावले.

 लॉस एंजिलिस ऑलिम्पिकचा मुहूर्त ठरला 

  • अमेरिकेतील लॉस एंजिलिस या शहरात २०२८ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकच्या उलट्या गणतीला मंगळवारपासून प्रारंभ झाला.
    current-affairs-olympics-timetable-america-july-2022

  • स्पर्धेचा उद्धाटन सोहळा १४ जुलै रोजी रंगेल, तर ३० जुलै रोजी समारोप होईल. 
  • त्यानंतर १५ ते २७ जुलै असा पॅरालिम्पिकचा कालावधी निश्‍चित करण्यात आला आहे. 
  • लॉस एंजिलिसमध्ये याअगोदर १९३२ आणि १९८४ मध्ये ऑलिम्पिकचे दोन वेळा आयोजन करण्यात आले होते. 
  • त्यामुळे लॉसएंजिलिस तिसऱ्यांदा ऑलिम्पिकचे आयोजन करताना दिसेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या