Mpsc Chalu ghadamodi - July 2022

बांधकाम क्षेत्रातील एक दिग्गज उद्योगपती काळाच्या पडद्याआड

  • बांधकाम क्षेत्रातील आघाडीची कंपनी 'शापूरजी पालनजी समूहा'चे अध्यक्ष पालनजी मिस्त्री यांच्या निधनामुळे भव्यदिव्य स्वप्ने प्रत्यक्षात उतरविणारा एक दिग्गज उद्योगपती काळाच्या पडद्याआड गेला.
  • देशातील सर्वांत मोठ्या कंपन्यांमध्ये गणना होणाऱ्या या समूहाची यशोगाथा लिहिण्यात पालनजी यांचा मोठा वाटा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आजपर्यंत देशात संपत्ती निर्माणाच्या कार्यात त्यांचे योगदान आहे. 
  • मूळ गुजरातमधील; नंतर मुंबईत स्थलांतरित झालेल्या या पारशी कुटुंबाने बांधकाम व्यवसायात पदार्पण केले आणि प्रगतीचा इतिहास घडविला. वडील शापूरजी यांनी गिरगाव चौपाटीचे फूटपाथ बांधण्यापासून काम सुरू केले. या संस्थेने पुढील काळात उभारलेल्या इमारती आजही मुंबईच्या 'लँडमार्क' आहेत.
  •  मलबार हिलचा तलाव, रिझर्व्ह बँकेची इमारत, ब्रेबॉर्न स्टेडियम, षण्मुखानंद सभागृह, मुंबई सेंट्रल स्टेशन, एनसीपीए यांसह अनेक तारांकित हॉटेलांच्या भव्य इमारतींची उभारणी या समूहाने केली. 


shapoorji pallonji Mistry group passed away
Pallonji Mistry

  • पालनजी यांनी अठराव्या वर्षी कंपनीत कारकीर्द सुरू केली आणि नवा दृष्टिकोन व आधुनिक व्यवस्थापन तंत्राने प्रगतीचा आलेख आणखी उंचावला.
  • ओमानच्या सुलतानाच्या आलिशान महालाची उभारणी करून त्यांनी सीमोल्लंघन केले. पुढे बांधकामासह अभियांत्रिकी, धरणे, वीजप्रकल्प, पूल आणि वित्तीय सेवा अशा क्षेत्रांत पालनजी यांनी कंपनीचा विस्तार केला.

Mpsc Current affairs - July 2022

  • आजमितीला ५० देशांमध्ये कंपनीचा कारभार असून, सुमारे ५० हजार कर्मचारी आहेत. खुद्द पालनजी यांची संपत्ती १३ अब्ज डॉलरची आहे. एवढे यश मिळविल्यानंतरही ते सार्वजनिक व्यासपीठांपासून बहुतांश दूर राहिले.
  • आयरिश महिलेशी विवाह करून त्यांनी आयर्लंडचे नागरिकत्व घेतले; मात्र त्यानंतरही त्यांनी बहुतांश जीवन मुंबईतच घालविले. 
  • टाटा समूहात भागभांडवल असलेले पालनजी, टाटा समूहात 'फँटम'या टोपणनावाने ओळखले जात. त्यांचे चिरंजीव सायरस यांनी टाटा समूहाचे अध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळली; परंतु पुढे मतभेदांनंतर ते बाहेर पडले. 
  • व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना पद्मभूषण सन्मानाने गौरविण्यात आले आहे.
पालनजी मिस्त्री यांना भावपूर्ण श्रद्धांजली ...