Free Online Chess Class ( Limited seats )

Free Online Chess Class ( Limited seats )

Mpsc chalu ghadamodi ISRO SSLV D 1 rocket

 इरत्रोच्या एसएसएलव्ही डी-१ रॉकेटचे लाँचिंग अयशस्वी 

 Mpsc chalu ghadamodi : ISRO's SSLV D1 rocket 

इस्त्रो म्हणजेच भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्थेने छोट्या उपग्रहांचे अंतरीक्षात प्रक्षेपण करण्यासाठी आज एसएसएलव्ही हे नवीन रॉकेट लाँच केले. तथापि यशस्वी उड्डाण होऊनही हे रॉकेट आपल्या निर्धारीत लक्ष्यापर्यंत पोहचू शकले नाही, त्यामुळे ते अपयशी ठरले आहे. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतरीक्ष प्रक्षेपण केंद्रातून या रॉकेटचे उड्डाण झाले होते.

Mpsc chalu ghadamodi ISRO SSLV D 1 rocket


इस्रोने म्हटले आहे की या रॉकेटने सारे अपेक्षित टप्पे यशस्वीपणे पार पाडले. परंतु ज्या कक्षेत हे रॉकेट स्थीरावणे अपेक्षित होते, त्या कक्षेपर्यंत ते पोहचू शकले नाही. यातून सोडण्यात आलेले उपग्रह आता कोणत्याही कामाचे राहिलेले नाहीत असेही इस्त्रोने म्हटले आहे. हे कशामुळे झाले याची कारणे इस्त्रोच्या वैज्ञानिकांना समजली असून त्यात आता पुढील काळात सुधारणा केल्या जातील अशी माहिती इस्रोच्या वतीने देण्यात आली आहे. या संबंधात तज्ज्ञांची एक समिती स्थापन केली जाणार असून ती समिती या अपयशाच्या कारणांचे विश्लेषण करणार आहे.

 एसएसएलव्ही रॉकेट : 

प्रक्षेपित करण्यात आलेले एसएसएलव्ही हे रॉकेट ३४ मिटर लांबीचे होते. ज्याची लांबी पीएसएलव्हीपेक्षा 10 मिटरने कमी होती. त्याचा व्यासही २.८ मीटर ऐवजी २ मीटर इतकाच होता. पीएसएलव्हीचे वजन ३२० किलो इतके होते त्यातुलनेत या एसएसएलव्हीचे वजन १२० किलो इतकेच होते. 

पीएसएलव्ही हे इस्त्रोचे सर्वात यशस्वी रॉकेट म्हणून गणले जाते. परंतु त्यातून नेहमीच मोठ्या उपग्रहांच्या प्रक्षेपक्षणाचे कार्य केले जाते. तथापि लहान उपग्रहांसाठी इस्त्रोने आज हे नवीन रॉकेट लाँच केले होते.दरम्यान इस्त्रो तर्फे एसएसएलव्हीची डी २ ही नवीन आवृत्तीही लवकरच प्रक्षेपित केली जाणार आहे.

नक्की वाचा : 👇👇

 Chalu ghadamodi-Current affairs 20 july 2022 in Marathi 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या