Mpsc daily chalu ghadamodi 09 Aug 2022
विश्वनाथन आनंद यांच्यावर आता उपाध्यक्षाची जबाबदारी
बुद्धिबळस्पर्धेत भारताला पाच वेळा विश्वविजेता बनवणारे दिग्गज विश्वनाथन आनंद यांच्यावर आता मोठी जबाबदारी पडली आहे. विश्वनाथन आनंद आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ म्हणजेच फिडे (FIDE) या संघटनेचे उपाध्यक्ष बनले आहेत.
तसेच संस्थेच्या अध्यक्षपदी रूसचे आर्केडी वोर्कोविच पुन्हा एकदा विराजमान झाले आहेत. आर्केडी वोर्कोविच यांना एकूण१५७ मते मिळाले, ज्याच्या जोरावर त्यांना दुसऱ्यांदा अध्यक्षपद मिळवता आले. त्यांचे विरोधक एंडरी बेरिशपोलेट्स यांना अवघ्या १६ मतांवर समाधान मानावे लागले.
४४ व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड दरम्यान आयोजित जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या फिडे काँग्रेस दरम्यान या निवडणुका झाल्या.
विश्वनाथन आनंद यांच्या कारकिर्दीचा विचार केला, जागतिक कनिष्ठ स्पर्धेत विजतेपद जिंकल्यानंतर ते भारताचे पहिले ग्रँडमास्टर बनले होते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर ते भारताचे प्रतिनिधित्व करत राहिले. त्यांनी भारतासाठी एकूण पाच विश्वविजेतेपद जिंकले. त्यांनी २०१७ मध्ये देशासाठी शेवटचे विजेतेपद पटकावले होते.
Mpsc Current Affairs Aug 2022
तसेच संस्थेच्या अध्यक्षपदी रूसचे आर्केडी वोर्कोविच पुन्हा एकदा विराजमान झाले आहेत. आर्केडी वोर्कोविच यांना एकूण१५७ मते मिळाले, ज्याच्या जोरावर त्यांना दुसऱ्यांदा अध्यक्षपद मिळवता आले. त्यांचे विरोधक एंडरी बेरिशपोलेट्स यांना अवघ्या १६ मतांवर समाधान मानावे लागले.४४ व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड दरम्यान आयोजित जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या फिडे काँग्रेस दरम्यान या निवडणुका झाल्या.
विश्वनाथन आनंद यांच्या कारकिर्दीचा विचार केला, जागतिक कनिष्ठ स्पर्धेत विजतेपद जिंकल्यानंतर ते भारताचे पहिले ग्रँडमास्टर बनले होते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर ते भारताचे प्रतिनिधित्व करत राहिले. त्यांनी भारतासाठी एकूण पाच विश्वविजेतेपद जिंकले. त्यांनी २०१७ मध्ये देशासाठी शेवटचे विजेतेपद पटकावले होते.
Commonwealth Games 2022
पी.व्ही. सिंधूने पुन्हा एकदा दमदार कामगिरी : तिचे राष्ट्रकुलमधील पहिले सुवर्ण पदक
भारताची अव्वल बॅडमिंटन खेळाडू पी.व्ही. सिंधूने पुन्हा एकदा दमदार कामगिरी केली आहे. काही दिवसांपासून इंग्लडमध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा सुरू होती. सिंधूचा हा सामना कॅनडाच्या मिचेल लीबबरोवर होणार होता. यापूर्वी सिंधूने सिंगापूर आणि मलेशियाच्या खेळाडूंना पराभूत केले होते.या सामन्यात पहिला गेम खेळताना मिचलने काही पाँईट्स कमवत सिंधूच्या जवळ येण्याचा प्रयत्न केला होता. तरीही सिंधूने ६-७ अशी आघाडी ठेवली होती. त्यानंतर सिंधूने आक्रमक खेळ खेळला होता. सिंधूने ही आघाडी १९-१५ अशी वाढवली आणि पहिला गेम जिंकला होता. सध्याच्या घडीला सिंधू चांगल्या फार्मात आहे. कारण यापूर्वी सिंधूने सिंगापूर खुली स्पर्धा जिंकली होती.
commonwealth games 2022
त्याचबरोबर राष्ट्रकुल स्पर्धेत ध्वजवाहक होण्याचा दुसर्यांदा मानही सिंधूला मिळाला होता.दरम्यान, यापूर्वी सिंधूने २०१४ साली राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते, तर २०१८ साली रौप्य पदाची कमाई केली होती. तर आता राष्ट्रकुल २०२२ मध्ये सुवर्णपदक. त्यामुळे तिचे राष्ट्रकुलमधील हे पहिले सुवर्ण पदक आहे.
नक्की वाचा : 👇👇
0 टिप्पण्या