Free Online Chess Class ( Limited seats )

Free Online Chess Class ( Limited seats )

Mpsc daily chalu ghadamodi 31 Aug 2022

 Mpsc daily chalu ghadamodi 31 Aug 2022 

 दिवाळीपासून जिओ 5 जी इंटरनेट सेवा सुरू होणार 


इंटरनेट सेवा दिवाळीपासून सुरू होणार असल्याची घोषणा रिलायन्स उद्योग समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी सोमवारी केली. पहिल्या टप्प्यातील जिओ 5 जी इंटरनेट सेवा देशातील चार महानगरांत सुरू होणार असून, पुढील वर्षापर्यंत देशभरात इंटरनेट सेवा देण्यात येणार आहे. 

Reliance-jio-5G-in-metro-cities

  • रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतील भाषणात रिलायन्स जिओ 5 जी इंटरनेट सेवा दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या मेट्रो शहरात दिवाळीपर्यंत सुरू करणार असल्याची घोषणा मुकेश अंबानी यांनी केली. 
  • रिलायन्स जिओ ५ जीमुळे देशात मोठा बदल होणार असून, डिजिटलायझेशनला मोठा हातभार लागणार असल्याचा विश्वास मुकेश अंबानी यांनी व्यक्त केला.
  • डिसेंबर २०२३ पर्यंत देशातील प्रत्येक शहरात 5 जी इंटरनेट सेवा देणार असल्याचे मुकेश अंबानी यांनी सांगितले. 
  • रिलायन्स आपल्या जिओ 5 जी सेवेसाठी अद्ययावत तंत्रज्ञान वापर करत असल्याचेही मुकेश अंबानी यांनी सांगितले. 
  • रिलायन्स जिओ 5 जी नेटवर्ककरिता दोन लाख कोटींची गुंतवणूक करणार आहे. मुकेश अंबानी यांनी सांगितले की, आम्ही सर्व ग्लोबल स्मार्टफोन्ससोबत काम करीत आहोत.

 अदानी ठरले जगातील तिसरे सर्वांत श्रीमंत 

  • भारतीय अब्जाधीश गौतम अदानी १३७.४ अब्ज डॉलर्सच्या (सुमारे ११ लाख कोटी रुपये) संपत्तीसह जगातील तिसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती बनले आहेत. फ्रान्सच्या बर्नार्ड अरनॉल्टला मागे टाकत त्यांनी हे स्थान मिळवले आहे. 
Goutam-Adani-3rd-richest-person


  • ब्लूमबर्ग बिलियनेयर्स इंडेक्सच्या टॉप थ्रीमध्ये आशियाई व्यक्तीने प्रवेश करण्याची ही पहिलीच वेळ आहे. आता ते RANK मध्ये मस्क आणि बेझोस यांच्या मागे आहे. टेस्लाचे संस्थापक एलन मस्क २५१ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह या यादीत अव्वल, तर बेझोस १५३ अब्ज डॉलर्ससह दुसऱ्या स्थानावर आहेत. 
  • टॉप १० यादीत अदानी हे एकमेव भारतीय आहेत. रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी ९१.९ अब्ज (७.३ लाख कोटी रुपये) संपत्तीसह ११ च्या क्रमांकावर आहेत.
  • गेल्या महिन्यात अदानी, चौथे सर्वात श्रीमंत उद्योगपती ठरले होते. त्यांनी बिल गेट्सना मागे टाकले होते. केवळ २०२२ मध्येच अदानी यांनी त्यांच्या एकूण संपत्तीमध्ये ६०.९ बिलियनची भर घातली आहे. हे प्रमाण कोणत्याही उद्योगपतीपेक्षा ५ पट जास्त आहे. 
  • फेब्रुवारीमध्ये त्यांनी पहिल्यांदाच रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांना मागे टाकत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून नाव कोरले होते.


 जगातील टॉप १० श्रीमंत 

  1. एलन मस्क       २५१ बिलियन डॉलर, 
  2. जेफ बेझोस       १५३ बिलियन डॉलर, 
  3. गौतम अदानी     १३७ बिलियन डॉलर, 
  4. बर्नार्ड अर्नाल्ट     १३६ बिलियन डॉलर, 
  5. बिल गेट्स         ११७ बिलियन डॉलर, 
  6. वॉरेन बफे         १०० बिलियन डॉलर, 
  7. लॅरी पेज           १०० बिलियन डॉलर, 
  8. सर्गेई बिन         ९५.८ बिलियन डॉलर, 
  9. स्टीव्ह बाल्मर     ९३.७ बिलियन डॉलर, 
  10. लॅरी एलिशन      ९३.३ बिलियन डॉलर.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या