Free Online Chess Class ( Limited seats )

Free Online Chess Class ( Limited seats )

Daily Chalu Ghadamodi / Current affairs 27 Sept 2022

 Daily Chalu Ghadamodi 27 Sept 2022 

 Daily Current affairs 27 Sept 2022   

 गुलाम नबींकडून डेमोक्रेटिक आझाद पक्षाची स्थापना 

काँग्रेसला रामराम ठोकणारे जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी सोमवारी त्यांच्या नव्या पक्षाची स्थापना केली. 'डेमोक्रेटिक आझाद पक्ष' (डीएपी) असे त्यांच्या नव्या पक्षाचे नाव आहे. 

राजधानी श्रीनगर येथे आझाद यांनी सहकाऱ्यांसोबत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी 'डेमोक्रेटिक आझाद पक्ष' स्थापन केल्याची घोषणा केली. उर्दू व संस्कृत भाषेतील सुमारे १५०० नावे पक्षासाठी सुचवण्यात आली. त्यापैकी लोकशाही, शांतता व स्वातंत्र्य या तत्त्वांना अनुसरून आम्ही 'डीएपी' पक्षाला प्राधान्य दिले.

democrative-azad-party-gulab-nabi-azad
google : Gulab nabi Azad & new party


चालू घडामोडी सप्टेंबर २०२२

आमचा पक्ष लोकशाही व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे प्रतीक राहील. आम्ही राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची विचारसरणी अंगिकारणार आहोत. इतर कोणत्याही पक्षासोबत आमचे वैर नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. काश्मीर खोऱ्यात शांतता प्रस्थापित करणे, तसेच परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी आमचा पक्ष प्रामाणिकपणे कार्य करणार असल्याचे गुलाम नबी आझाद म्हणाले. 

'डीएपी' पक्षाच्या पिवळा, पांढरा आणि निळ्या रंगांच्या ध्वजाचे त्यांनी अनावरण केले.


 फिलिपिन्सला नोरू वादळाने झोडपले, ६ ठार 


उत्तर फिलिपिन्समध्ये 'नोरू' नामक वादळाने थैमान घातल्याने जनजीवन विस्कळीत झाले. वादळाशी निगडित घटनांमुळे ६ ठार, तर अनेक जण जखमी झाले. या वादळामुळे दोन प्रांतांतील वीजपुरवठा खंडित झाला असून, अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. ग्रामीण क्षेत्रातील अनेक भागात लोक पुरात अडकले आहेत. 

daily-current-affairs-chalu-ghadamodi-sept-2022
google : Noru-Typhoon-in-Philippines



Current Affairs Sept 2022

या आपत्तीमुळे देशाची राजधानी मनिला शहर व आजूबाजूच्या क्षेत्रातील शाळा व सरकारी कार्यालये बंद करावी लागली. क्युजोन प्रांतातील बर्डियोस क्षेत्राला धडकल्यानंतर या वादळाचा प्रभाव कमी झाला होता; मात्र ल्युजोन क्षेत्रात दाखल झाल्यानंतर नोरूने भीषण रूप धारण केले. 

सुरक्षेचा उपाय म्हणून या क्षेत्रातील ५२ हजार नागरिकांना वादळ धडकण्यापूर्वीच सुरक्षितस्थळी हलवल्याने मोठा अनर्थ टळला. वादळामुळे अरोरा प्रांताला सर्वाधिक फटका बसला असून, ६ हजार घरांची पडझड झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या