भारतीय महिला क्रिकेट संघाने ३-० मालिका जिंकली
झुलन गोस्वामीची निवृत्ती
भारतीय महिला क्रिकेट संघाने लॉर्डसवर इंग्लंडच्या महिला संघाचा १६ धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने ३-० अशी मालिका जिंकली. भारतीय संघाने इग्लंडपुढे १७० धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र, इंग्लंडचा संघ १५३ धावांमध्ये गारद झाला. भारतीय गोलंदाजांपुढे त्यांची फलंदाजी निष्प्रभ ठरली.
Jhulan Goswami take retirement
भारताची महान आणि अनुभवी खेळाडू झुलन गोस्वामी आजचा सामना खेळून निवृत्त झाली. झुलन गोस्वामीने आज इंग्लंडच्या दोन विकेट घेतल्या. टीम इंडियाने मालिका विजयासह सर्वाधिक अनुभवी असणाऱ्या झुलन गोस्वामी हिला अनोखे गिफ्ट दिले.
![]() |
google : Jhulan Goswami |
झुलन गोस्वामी हिला अखेरच्या मॅचमध्ये फलंदाजीमध्ये कमाल दाखवण्यात आली नाही. मात्र, तिने बॉलिंगमध्ये इंग्लंडच्या दोन विकेट घेतल्या. झुलन मैदानावर बॅटिंगसाठी आली त्यावेळी इंग्लंडच्या खेळाडूंनी तिला गार्ड ऑफ ऑनर दिला. झुलन गोस्वामीने दोन विकेट घेतल्या तर तीन ओव्हर्स निर्धाव टाकल्या.
झुलनने 20 वर्षांच्या कारकिर्दीत भारतासाठी
- 12 कसोटी, 204 वनडे आणि 68 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले.
- झुलनने कसोटीत 44 आणि एकदिवसीय सामन्यात 255 विकेट घेतल्या.
- याशिवाय त्याने टी-20 मध्ये 56 विकेट्स घेतल्या आहेत.
0 टिप्पण्या