Free Online Chess Class ( Limited seats )

Free Online Chess Class ( Limited seats )

PM Narendra Modi to launch 5G services in India on October 1/ 1 ऑक्टोबर रोजी भारतात 5G सेवा सुरू होणार

 ५-जी इंटरनेट १ ऑक्टोबरपासून 


  • पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ
  • ऑक्टोबर महिन्यापासून भारतात इंटरनेट सेवा सुस्साट होणार  
  • २ - जीबीचा चित्रपट दहा सेकंदात डाऊनलोड

 5G services in India on October 1 

सरकारच्या राष्ट्रीय ब्रॉडबँड मिशनने यासंदर्भात ट्विट करत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, भारताचे डिजिटल परिवर्तन आणि कनेक्टिव्हिटीला नवीन उंचीवर नेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतात ५-जी सेवेचा शुभारंभ होईल. १ ऑक्टोबर २०२२ पासून ५-जी इंटरनेट सेवा सुरु होणार आहे. यामुळे भारतीयांना मोठा फायदा होणार आहे. 
तज्ञांच्या मते, ५-जी तंत्रज्ञानाचा भारताला खूप फायदा होईल. याचा भारतीय अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. 
 
5g-airtel-jio-reliance-network
google : 5G


५- जी मुळे भारतीय अर्थव्यवस्थेला २०२३ ते २०४० दरम्यान ३६.४ ट्रिलियन रुपये (सुमारे ४५५ अब्ज डॉलर) फायदा होण्याची शक्यता आहे.

ऑगस्ट महिन्यात ५-जी स्पेक्ट्रमचा लिलाव पार पडला होता. त्यावेळी केंद्रीय तंत्रज्ञान आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी देशभरात १२ ऑक्टोबरपर्यंत ५-जी सेवा सुरु होईल अशी माहिती दिली होती. त्यानुसार आता ऑक्टोबर महिन्यापासून भारतामध्ये ५-जी इंटरनेट सेवा उपलब्ध असेल. 

'इंडिया मोबाइल कॉंग्रेस' या आशियातील सर्वात मोठे तंत्रज्ञान प्रदर्शनात या योजनेचा शुभारंभ होईल. भारत सरकारने अल्पावधीत देशात ५-जी इंटरनेट सेवांचे ८० टक्के कव्हरेज करण्याचे लक्ष्य ठेवल्याचे, असे केंद्रीय तंत्रज्ञान आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते. 

 Airtel & Reliance jio  

दूरसंचार क्षेत्रतील एअरटेल व जिओ या दोन दिग्गज कंपन्या आपली ५ जी नेटवर्क सेवा लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. एअरटेलने यासाठी एरिक्सन, नोकीया च सॅमसंगसोबत करार केला आहे. ही पाचव्या पिढीची दूरसंचार सेवा कार्यान्वित झाल्यानंतर ग्राहकांची अनेक कामे वेगवान होणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या