Free Online Chess Class ( Limited seats )

Free Online Chess Class ( Limited seats )

Daily current affairs / chalu ghadamdi oct 2022 in marathi

 Daily Current Affairs Oct 2022 

Daily current affairs Sports

 sports : ICC T-20 World Cup 2022 

रिली रोस्सोने विश्वचषकातील पहिले शतक झळकावत क्विंटन डी कॉक (६३) सोबत रचलेल्या विक्रमी भागीदारीमुळे दक्षिण आफ्रिका संघाने 'अव्वल १२' मधील गट क्रमांक दोन च्या सामन्यात बांगलादेशचा १०४ धावांनी पराभव केला. 

rilee rossouw


झिम्बाब्वेविरोधातील सलामीची लढत पावसामुळे निकालरहित राहिल्यानंतर आफ्रिकेने दुसऱ्या सामन्यात सरशी साधत आयसीसी ( must read : ICC full form, headquarters etc.) ट्वेण्टी-२० विश्वचषक स्पर्धेत आपले खाते उघडले. रोस्सोने ५६ चेंडूंत ७ चौकार आणि ८ षटकारांनी १०९ धावांची शतकी खेळी उभारत संघाला ५ बाद २०५ धावा उभारून दिल्या.

 रिली रोस्सोचा जागतिक विक्रम ( world record ) 


  • आंतरराष्ट्रीय स्तरावर ट्वेण्टी -२० प्रकारात सलग दोन सामन्यांत शतक ठोकणारा रोस्सो दुसरा फलंदाज ठरला. भारताविरोधातील तीन ट्वेण्टी-२० सामन्यांच्या मालिकेत रोस्सोने ( ४ ऑक्टोबर, २०२२ रोजी इंदूर ) नाबाद १०० धावा काढल्या होत्या.

  • आंतरराष्ट्रीय स्तरावर सलग दोन शतके झळकावणारा तो दुसरा फलंदाज ठरला आहे.

  • रोस्सोने यंदाच्या आयसीसी ट्वेण्टी-२० विश्वचषक स्पर्धेत पहिले शतक झळकावले. विश्वचषकातील तो एकूण दहावा शतकवीर ठरला आहे. तसेच द. आफ्रिकेकडून विश्वचषकात शतक झळकावणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. 

विश्वचषकातील दहा शतकवीरात 
Daily chalu ghadamodi oct 2022 for mpsc

भारताकडून सुरेश रैना (१०१) या पंक्तीत द्वितीय स्थानावर उभा आहे.
पहिला मान वेस्ट इंडीजच्या ख्रिस गेलचा (११७) लागतो.
तर विश्वचषकात सर्वाधिक धावा न्यूझीलंडच्या ब्रँडन मॅककुलमच्या (१२३) नावावर आहे.

 संगकारा - जयवर्धनेचा विक्रम मोडित 

रोस्सो व क्विंटन यांनी ८७ चेंडूंत दुसऱ्या गड्यासाठी १६८ धावांची भागीदारी रचली. या जोडीने या बळावर ट्वेण्टी- २० विश्वचषकातील कोणत्याही गड्यासाठी सर्वोत्तम भागीदारीचा नवा विक्रम आपल्या नावावर केला. 
श्रीलंकेचे कुमार संगकारा आणि महेला जयवर्धने यांचा २०१० मधील वेस्ट इंडीजविरुद्ध १६६ धावांची भागीदारी या जोडीने मोडीत काढली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या