ऐतिहासिक क्षण : 

 सुखोई- ३० या लढाऊ विमानाने आकाशात उत्तुंग भरारी 


भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारी आसामच्या तेजपूर एअरफोर्स स्टेशनवरून सुखोई- ३० या लढाऊ विमानाने आकाशात उत्तुंग भरारी घेतली. इतिहासात नोंद केली जावी असाच हा क्षण होता. राष्ट्रपती तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुख असतात. त्यांनी 30 मिनिटे भरारी घेतली त्यानंतर हिमालय आणि ब्रह्मपुत्र तसेच तेजपूर खोरे हे त्यांनी आकाशातून पाहिले.

chalu-ghadamodi-sukhoi-30-fighter-jet
President Murmu - Sukhoi-30

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूनी ज्या सुखोई- ३० या विमानातून भरारी घेतली ते विमान ग्रुप कॅप्टन नवीन कुमार यांनी चालवले. ८०० किमी प्रतितास या वेगाने हे विमान चालवण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अशा प्रकारे सुखोईतून उत्तुंग भरारी घेणाऱ्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत. 

दरम्यान, व्हिजिटर्स बुकमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूनी त्यांचा अभिप्राय लिहिला. 
मार्च २०२३ मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आयएनएस विक्रांतचा दौरा केला होता. त्यावेळी भारतात निर्मिती करण्यात आलेल्या विमानांची त्यांनी माहिती घेतली होती.