Free Online Chess Class ( Limited seats )

Free Online Chess Class ( Limited seats )

Chalu ghadamodi May 2023 / चालू घडामोडी मे २०२३

 बैलगाडी शर्यतीस सर्वोच्च न्यायालयाची परवानगी 


गेल्या अनेक महिन्यांपासून अवघ्या महाराष्ट्राला प्रतिक्षा असणाऱ्या बैलगाडी शर्यती संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. डिसेंबर महिन्यात यासंदर्भातली सुनावणी पूर्ण झाली होती. तेव्हा याबाबतचा निकाल राखून ठेवला होता. अखेर गुरूवारी या संदर्भातला निकाल न्यायालयाने दिला असून त्यानुसार महाराष्ट्रातील बैलगाडी शर्यत, तामिळनाडूमधील जल्लीकटू आणि कर्नाटकमधील कम्बाला या खेळांना परवानगी दिली आहे. 

supreme-court-of-india

अशा खेळांमध्ये प्राण्यांचे हाल होत असल्याचा दावा करणाऱ्या याचिका प्राणी मित्र संघटनांनी केल्या होत्या. त्यावर अखेर न्यायालयाने निकाल दिला आहे. महाराष्ट्रात बैलगाडी शर्यत, तामिळनाडूमध्ये जल्लाकडू आणि कर्नाटकमध्ये कम्बाला या खेळांसाठी संबंधित तिन्ही राज्य सरकारांनी त्या-त्या राज्यांसाठी वन्यजीव संरक्षण कायद्यात काही सुधारणा केल्या होत्या. त्यानुसार त्या त्या राज्यांनी या खेळांना मान्यताही दिली. 
 
 चालू घडामोडी मे २०२३ 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या