Free Online Chess Class ( Limited seats )

Free Online Chess Class ( Limited seats )

India has been officially handed over the presidency for next year's G20 Summit

पुढील वर्षी जी-२० परिषदेचे भारत अध्यक्षपद भूषवणार

India has been officially handed over the presidency for next year's G20 Summit

इंडोनेशियाने जी - २० चे अध्यक्षपद भारताकडे सोपवले असून, जी-२० ची बाली शिखर परिषद बुधवारी दुसऱ्या दिवशी संपली. आता पुढील वर्षी होणाऱ्या परिषदेचे अध्यक्षपद भारत भूषवेल. 
यावेळी संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, 

pm-modi-G20-summit-2022-at-bali-Indoneshiya


  • जी-२० चे अध्यक्षपद भूषवणे ही प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे. 
  • आमच्या पाहुण्यांना भारताच्या अद्भूततेची, विविधता, सर्वसमावेशक परंपरांची ओळख करून दिली जाईल. सांस्कृतिक समृध्दीचा पूर्ण अनुभव मिळेल. 
  • यासोबतच महिलांच्या सहभागाशिवाय जगाचा विकास शक्य नसल्याचे पंतप्रधान म्हणाले. आमच्या जी-२० अजेंड्यातही आम्हाला महिला नेतृत्वाला प्राधान्य द्यावे लागेल. 
  • यासोबत ते म्हणाले की, भारताचे जी-२० चे अध्यक्षपद सर्वसमावेशक, महत्त्वाकांक्षी, निर्णायक आणि नवीन कल्पनांच्या संकल्पनेसाठी आणि गट कृतीला गती देण्यासाठी जागतिक प्रमुख प्रवर्तक म्हणून काम करेल. 
  • जग भौगोलिक- राजकीय तणाव, आर्थिक मंदी, ऊर्जेच्या वाढलेल्या किमती, महामारीचे दुष्परिणाम आणि इतर समस्यांशी झुंजत असताना भारत जी-२० ची जबाबदारी घेत आहे, असेही पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.

 मागील जी २० शिखर परिषदा : 


2018    :    Mar del Plata ( Argentina )
2019    :    Tsukuba ( Japan )
2021    :    Sorrento ( Italy )
2022    :    Bali ( Indonesia  )


 महत्त्वाच्या इतर घडामोडी : 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या